salman khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: जेव्हा सलमान खान मद्यधुंद अवस्थेत चित्रपटाच्या सेटवर पोहोचला, दिग्दर्शकाला थांबवावं लागलं शूटिंग

आम्ही तुम्हाला सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील स्टार्स अनेकदा त्यांच्या भूमिकांसाठी टोकाला जातात. अनेक वेळा, चित्रपटांमध्ये वास्तविक दिसण्यासाठी, हे कलाकार बॉडी ट्रांसफॉर्मेशनपासून दारूच्या नशेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मग्न होतात. आम्ही तुम्हाला सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

चल मेरे भाई या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. या चित्रपटात सलमान खान आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. डेव्हिड धवनने याचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाच्या एका दृश्यात सलमानला नशेत अभिनय करावा लागला, तो रियल दिसावा म्हणून तो दारू पिऊन सेटवर पोहोचला. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला शूटिंग रद्द करावे लागले.

हा रंजक किस्सा खुद्द सलमाननेच 'कॉफी विथ करण' या शोमध्ये उघड केला होता. शोमध्ये त्याने सांगितले की, चल मेरे भाईमधील एका गाण्यात तो मद्यधुंद अवस्थेत दिसणार होता, पण गाण्याचे चित्रीकरण नीट होत नव्हते. यानंतर त्याने रियल दिसण्यासाठी दारू पिण्याचे ठरवले.

शोमध्ये, अभिनेत्याने सांगितले की तो रिकाम्या पोटी दोन पेग घेऊन शूटसाठी पोहोचला, परंतु नशेमुळे तो अजिबात लिप सिंक करू शकला नाही, त्यानंतर डेव्हिड धवनला शूट रद्द करावे लागले. चल मेरे भाई 2000 मध्ये रिलीज झाला होता.

हा कॉमेडी चित्रपट लोकांना खूप आवडला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान लवकरच किसी की भाई किसी की जानमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय पूजा हेगडे, व्यंकटेश आणि शहनाज गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तो ईदला प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT