मनोरंजन

ती परत आलीये : कोण असेल या मुखवट्यामागे?

कधी दूर होणार तिच्या मुखवट्यावरचा पडदा?

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रसारित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. यात 'लागीर झालं जी', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. विशेष म्हणजे याच मालिकांच्या यादीत आता 'ती परत आलीये' या नव्या मालिकेचं नाव जोडलं जात आहे. सस्पेन्स थ्रिलर प्रकारात मोडणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलिकडेच या मालिकेत अभिनेता विजय कदम मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं. मात्र, मालिकेतील 'ती' म्हणजे नेमकी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यातच मालिकेतील तिच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. (ti parat aaliye zee marathi new serial new promo release who is she-ssj93)

अलिकडेच 'ती परत आलीये' या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे भीतीने अंगावर काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असं एकंदरीत वातावरण या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. याच प्रोमोमध्ये तिचा चेहरा समोर आला आहे. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये भयावह वाटणारा एक मुखवटा दिसून आला आहे. परंतु, या मुखवट्यामागे नेमकी कोणती अभिनेत्री तिची भूमिका साकारणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

"तिचा हा भयावह चेहरा मालिकेतदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती नेमकी कोण हे मला माहितीये परंतु, तिचा प्रवास मात्र दूरवरचा आहे. त्यामुळेच तिच्या भूमिकेभोवतीचं गूढ वलय रंगवण्यात आलं आहे, असं विजय कदम म्हणाले.

दरम्यान, विजय कदम यांच्या व्यतिरिक्त या मालिकेतील कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्याच ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT