tiger 3 banned in oman and qatar due to islamic issue salman khan katrina kaif Esakal
मनोरंजन

Tiger 3: या देशांमध्ये 'टायगर 3' वर बंदी, नो एंट्रीचं कारण धक्कादायक .. घ्या जाणून

सलमान - कतरिनाच्या टायगर 3 वर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आलीय, हे आहे कारण

Devendra Jadhav

Tiger 3 News: सलमान खान - कतरिना कैफ यांच्या टायगर 3 सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या दोनच दिवसात टायगर 3 भेटीला येणार आहे. टायगर 3 च्या अॅडव्हान्स बुकींगला भारतात प्रचंड प्रतिसादात सुरुवात झालीय.

अशातच सलमान खानच्या टायगर 3 ला रिलीजआधीच मोठा फटका बसलाय. टायगर 3 वर काही देशांंमध्ये बंदी घालण्यात आलीय. जाणून घ्या सविस्तर

सलमान खानच्या टायगर 3 वर या देशांंमध्ये बंदी

सलमान खान - कतरिना कैफच्या टायगर 3 सिनेमाला रिलीजआधीच मोठा फटका बसलाय. 'टायगर 3'वर कतार आणि ओमान अशा देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. इस्लामिक देश आणि देशातील व्यक्तिरेखांचं नकारात्मक चित्रण हे बंदीचं कारण असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे सलमानच्या टायगर 3 ला रिलीजआधीच मोठं नुकसान सहन करावं लागलंय.

टायगर 3 चित्रपटातील सीन्स तुर्की, रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये शूट करण्यात आली आहेत, जिथे सलमान जागतिक दहशतवादी संघटनेशी सामना करताना दिसणार आहे.

या चित्रपटात काही इस्लामिक देश आणि पात्रांना वाईट पद्धतीने दाखवण्यात आले आहे. ज्यामुळे कुवेत, ओमान आणि कतारमध्ये टायगर 3 वर बंदी घालण्यात आली आहे.

याआधी अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या ऐतिहासिक चित्रपटावर कुवेत आणि ओमानमध्ये बंदी घातली होती.

'टायगर 3' च्या कलेक्शनवर परिणाम होणार आहे

'टायगर 3' ला इस्लामिक देशांच्या सरकार आणि सेन्सॉर बोर्डांच्या आक्षेपांचा सामना करावा लागला आहे. चित्रपटांच्या निर्मात्यांनी अद्याप बंदी किंवा चित्रपटांमध्ये कोणतेही बदल करण्याच्या शक्यतेवर भाष्य केलेले नाही.

ओमान आणि कतारसारखे आखाती देश ही बॉलीवूड चित्रपटांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असल्याने या बंदीमुळे टायगर 3 च्या परदेशातील बॉक्स ऑफीस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT