tiger 3 box office collection day 1 salman khan katrina kaif emraan hashmi  SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Box Office: सलमानच्या टायगरचा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कमावले 'इतके' कोटी

सलमान खानचा टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Tiger 3 Box Office Day 1: सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टायगर 3 काल १२ नोव्हेंबरला बॉक्स ऑफीसवर रिलीज झाला. टायगर 3 च्या माध्यमातुन सलमान - कतरिना यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली.

टायगर 3 बॉक्स ऑफीसवर पहिल्याच दिवशी सगळे रेकॉर्ड मोडणार अशी चर्चा होती. दरम्यान सलमान - कतरिनाच्या टायगर 3 च्या बॉक्स ऑफीस कमाईचे आकडे समोर आले आहेत.

सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट टायगर 3 ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. sacnilk.com वरील अहवालानुसार, टायगर 3 ने भारतात पहिल्या दिवशी एकूण ₹44.5 कोटींची कमाई केली आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये टायगर 3 १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल अशी दाट शक्यता आहे.

टायगर 3 विषयी एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ओडिशातील भुवनेश्वर भागातील महाराजा पिक्चर पॅलेस थिएटर दिसतं. या थिएटरबाहेर सलमान खानच्या फॅन्सनी एकच जल्लोष केलाय.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की सलमानच्या टायगर 3 चे मोठे कटआऊट्स लावलेले पाहायला मिळत आहेत. याशिवाय फॅन्सनी टायगर सारखी वेशभुषा केली असुन रुमाल गुंडाळला आहे. थिएटरबाहेर नाचत सलमानच्या फॅन्सनी टायगर 3 चं जंगी स्वागत केलेलं पाहायला मिळतं.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT