salman khan tiger 3 fans burst firecrackers at 'Tiger' entry in theatres, watch video SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Box Office Collection Day 2: टायगरची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दोन दिवसातच सलमाननं ठोकली सेंच्यूरी

Vaishali Patil

Tiger 3 Box Office Collection Day 2: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती तो सिनेमा म्हणजेच टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर रविवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. भाईजानचे चाहते या चित्रपटासाठी खुपच उत्सुक होते. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' ने आता रिलिजच्या दोन दिवसातच सगळे रेकॉर्ड मोडत कमाईचे नवीन विक्रम केले आहेत.

'टायगर 3' ने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग केली होती. रिलीजच्या पहिल्याच दिवशी जोरदार कलेक्शन केले तर सोमवारी देखील 'टायगर 3' ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला.

रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.50 कोटींची कमाई केल्यानंतर आता 'टायगर 3' रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडेही समोर आले आहेत. 'टायगर 3' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी किती कोटींचा गल्ला जमवला आहे यावर नजर टाकूया.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'टायगर 3' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपये कमवले आहेत. या आकड्यासोबतच 'टायगर 3' ची दोन दिवसांत एकूण कमाई आता 102कोटी रुपये झाली आहे. या कमाईसोबत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहे.

आता टायगर 3 ने 'बाहुबली 2' , 'गदर आणि ' टायगर जिंदा है' , 'जवान', 'बजरंगी भाईजान' , 'केजी चॅप्टर 2' , 'पठाण' यासह बऱ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'टायगर 3' आता विकेंडच्या शेवटी किती कोटींचा गल्ला जमवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

दिग्दर्शक मनीष शर्माचा 'टायगर 3' हा एक अॅक्शन थ्रिलर आहे ज्यामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत तर रेवती, सिमरन, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरे आणि आमिर बशीर हे देखील आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT