Tiger 3 Movie Box Office Collection Salman Khan  Esakal
मनोरंजन

Tiger 3 Box Office: टायगर सुस्तावला! ना 'गदर' ना 'जवान'चा रेकॉर्ड मोडू शकला, बॉक्स ऑफिसवरील कमाई थंडावली

'टायगर 3' ने पहिल्या दिवशी 44 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Vaishali Patil

Tiger 3 Box Office Collection Day 9: गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानचे चाहते 'टायगर 3' ची प्रतिक्षा करत होते. सलमानचा हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्या दिवशी या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली.

'टायगर 3' ने पहिल्या दिवशी 44 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर 'टायगर 3' ने फक्त रिलिजच्या पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली मात्र त्यानंतर टायगच्या कमाईचा आलेख सारखा खाली घसरताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली.

मात्र त्यानंतर चित्रपटाची कमाई फारच निराशाजनक आहे. टायगर 3' ने रिलीजच्या 9व्या दिवशी म्हणजे सोमवारी किती कोटींचा गल्ला जमवला हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता त्यातच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे.

तर दुसरीकडे सनी देओलने सलमान खानसाठी एक खास पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली आहे. ज्यामुळे सर्वत्र सनी पाजीची चर्चा सुरु आहे.

सनी देओलने सलमान खानला मिठी मारतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, "जीत गए". सध्या सोशल मिडियावर सलमान आणि सनी पाजीचा फोटो व्हायरल होत आहे.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर Sacknilk च्या मते, चित्रपटाने सोमवारी फक्त 6.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 236.43 कोटी रुपये झाले. जगभरात या सिनेमाने फक्त 350 कोटी रुपयांच्या गल्ला जमवला आहे.

'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 'टायगर 3' मधील इमरान हाश्मीची भुमिका प्रेक्षकांना खुप आवडत आहे.

अशा परिस्थितीत सलमान खानच्या 'टायगर 3' 300 कोटींचा टप्पा पार करेल की नाही यात शंका आहे. त्यामुळे आता सनी देओलच्या गदर 2 आणि शाहरुख खानच्या जवानचा रेकॉर्ड सलमान खानचा टायगर 3 मोडू शकणार नाही असं चित्र सध्या दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

Fertilizer Price Hike: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा धक्का; खतांचे दर २०० ते ६०० रुपयांनी वाढले, शेतीचा खर्च गगनाला

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

SCROLL FOR NEXT