Tiger 3 First Song Leke Prabhu Ka Naam:  Esakal
मनोरंजन

Tiger 3 Song: 'लेके प्रभु का नाम'वर सलमान-कतरिनाचे ठुमके! 'टायगर 3' मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Tiger 3 First Song Leke Prabhu Ka Naam: सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Vaishali Patil

Tiger 3 First Song Leke Prabhu Ka Naam:

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी टायगर 3 या सिनेमासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर प्रेक्षकांना खुप आवडला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पहायला मिळणार आहे.

या चित्रपटातून पुन्हा 'टायगर' आणि 'झोया'ची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येणार आहे. आता त्याच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमानचे चाहते या गाण्याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. आता निर्मात्यांनी अरिजित सिंगच्या आवाजातील चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. 'लेके प्रभु का नाम' हे गाण्याचे टायटल आहे.

'लेके प्रभु का नाम' या गाण्याचा टिझर रिलीज झाल्यानंतर चाहते या गाण्यासाठी उत्सुक होते. या गाण्यात पुन्हा एकादा टायगर त्याच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे तर कतरिनाने देखील तिचे डान्स कौशल्य दाखवले आहेत.

'लेके प्रभु का नाम' या गाण्याला अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी आवाज दिला आहे. तर तब्बल नऊ वर्षानंतर अरिजीतने सलमानसाठी गाणे गायलं आहे. या गाण्याद्वारे दोघांमधील वादही मिटला आहे.

सध्या हे गाण सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. एकीकडे सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांचे या गाण्याला खुप प्रेम मिळत आहे तर दुसरीकडे काहींनी सलमान खानला त्याच्या डान्ससाठी ट्रोलही केलं आहे. या गाण्याला सलमान-कतरिनाच्या केमिस्ट्रीशिवाय अरिजित सिंगने आवाजाने सर्वांना मोहित केलं आहे.

टायगर 3 हा स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ ही जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तर यावेळी चित्रपटात खलनायक म्हणुन इम्रान हाश्मीची एंट्री झाली आहे. तर शाहरुख या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे.

टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर 12 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT