tiger 3 review by krk after watch tiger 3 during interval salman khan katrina kaif  SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Kamal Khan: तर आदित्य चोप्रावर FIR करा, टायगर 3 पाहायला गेल्यावर कमाल खानचा व्हिडीओ चर्चेत

KRK म्हणजेच कमाल आर खानचा टायगर 3 विषयीचा व्हिडीओ चर्चेत आहे

Devendra Jadhav

Tiger 3 review by KRK: सलमान खानचा टायगर 3 सिनेमा आज रिलीज झालाय. यावर्षी शाहरुखच्या पठाण सिनेमात सलमान खानने कॅमिओ केल्यापासुन सर्वांना टायगर 3 ची उत्सुकता होती. अखेर आज टायगर 3 जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालाय.

टायगर 3 पाहतानाच कमाल आर खान म्हणजेच KRK चा व्हिडीओ चर्चेत आहे. KRK ने सलमान खानच्या टायगर 3 बद्दल केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

टायगर 3 पाहण्यासाठी गेलेला KRK काय म्हणाला ?

KRK टायगर 3 पाहायला गेला. यावेळी सिनेमाचा इंटरव्हल होताच KRK म्हणाला, मी टायगर 3 पाहायला आलोय PVR सिनेमात. मी अर्धमेला झालोय. माझं डोकं किती दुखतंय, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता मला जीवंत राहायचं असेल तर मी रोल आणि एनर्जी ड्रिंक घेईल.

KRK पुढे म्हणाला, "जर मी सिनेमा पाहून थिएटरमधून जीवंत बाहेर आलो नाही, जर सिनेमा पाहत असतानाचा माझा मृत्यु झाला तर तुम्ही थेट सिनेमाचा निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शकावर FIR दाखल करा. कारण जर त्यांनी अशी वाईट फिल्म बनवली असेल तर माझ्या मृत्युला तेच कारणीभुत असतील. तर मित्रांनो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा."

असा व्हिडीओ KRK ने पोस्ट केलाय. सध्या या व्हिडीओची खुपच चर्चा आहे.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशन देखील दिसणार आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

SCROLL FOR NEXT