jackie shroff 
मनोरंजन

माझ्यात मंगोलियन चायनीज अन् फ्रेंच 'जीन्स' टायगर चर्चेत

जेव्हा टायगर (tiger shroff) हा अरबाज खानच्या (arbaaz khan) पिंच (pintch) नावाच्या शो मध्ये गेला तेव्हापासून तो चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - जेव्हा टायगर (tiger shroff) हा अरबाज खानच्या (arbaaz khan) पिंच (pintch) नावाच्या शो मध्ये गेला तेव्हापासून तो चर्चेत आला आहे. त्यानं त्या शो मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे केले. काही धक्कादायक माहितीही दिली. त्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन तर झालेच पण त्यांना त्या मुलाखतीतून नवीन माहितीही मिळाल्याचे दिसून आले आहे. टायगरच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास त्याच्याकडे मोठ्या बॅनरचे चित्रपट आहे. तो त्याच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र त्याबरोबरच अरबाजच्या त्या शो नं टायगरला चर्चेत ठेवले आहे.

आपण एका मिश्र कुटूंबातून आलो आहोत अशा प्रकारचं वक्तव्य टायरगनं केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना नवल वाटलं आहे. टायगर हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आणि मॉडेल आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. पिंच या शो मध्ये टायगरनं आपल्या इंटरेस्टिंग जेनेटीक तडक्याविषयी सांगितलं आहे. अरबाजनं त्याला ती गोष्ट सविस्तरपणे चाहत्यांना सांगण्यास सांगितली. त्या अगोदर अरबाज त्याला म्हणाला, तुझ्यात आई, वडील यांच्याकडून आलेले जीन्स वेगळे आहेत. हे सगळं एक प्रकारचं कॉकटेल आहे. त्यावर टायगरनं दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे.

टायगर म्हणाला, माझ्या वडिलांचे वडिल हे गुजराती होते. वडिलांची आई ही तुर्कमिनिस्तानी होती थोडक्यात मंगोलियन - चायनीज. ती मुस्लिम होती. आईची आई ही फ्रेंच आहे. आणि आईचे वडिल हे बंगाली आहेत. त्यामुळे मी अनेक गोष्टींचं कॉकटेल आहे. हे सांगताना टायगरला नवल वाटत होते. आपल्या परिवारात एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत. नाही म्हटलं तरी त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. असेही त्याचे म्हणणे होते.

त्यामुळे आता मलाच माझ्याविषयी फारशी माहीती नाही. 2015 मध्ये जॅकी श्रॉफ यांनी पीटीआयला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की, मला माझ्या आईवर एक माहितीपट तयार करायचा आहे. मी आईकडून खूप काही गोष्टी ऐकल्या आहेत. त्याचे जतन करण्यासाठी माझ्या डोक्यात माहितीपटाची कल्पना होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT