Tiger Shorff Sunny Leonie ED Raid Mahadev Online Betting esakal
मनोरंजन

Bollywood Celebrity ED Raid : टायगर श्रॉफ, सनी लियोनी अन् नेहा कक्कर ईडीच्या रडारवर

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Tiger Shorff Sunny Leonie ED Raid Mahadev Online Betting : बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री सनी लियोनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रेटी ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपच्या संदर्भात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील विशाल ददलानी, कृष्णा अभिषेक सह आणखी काही सेलिब्रेटींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रेटींवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

महादेव ऑनलाईन बेटींग अॅपच्या संदर्भात ईडीनं छापेमारी करण्यात आली आहे. अशी माहिती साम टीव्ही वृत्तवाहिनीनं दिली आहे.

यासगळ्या कारवाईमध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार जाळ्यात अडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यत ईडीनं तब्बल ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. ही कारवाई महादेव ऑनलाईन बेटींग अॅपशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. यात एकुण ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोटयवधी रुपयांच्या रोख देवाण-घेवाणीची चौकशी होणार आहे. यात नुसरत भरुचाचेही नाव घेतले जात आहे. विदेशातील एका मोठ्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. त्यांना एका प्रायव्हेट प्लेनमधून त्या लग्नासाठी नेण्यात आले होते. अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT