tiger shroff disha patnis Alia bhatt and ranbir kapoor head to Maldives  Team esakal
मनोरंजन

देशात कोरोना, बॉलीवूड चाललं मालदीवला

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीही मालदिवला गेले आहेत

युगंधर ताजणे

मुंबई - सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक सेलिब्रेटी लोकांना घरी राहा सुरक्षित राहा आणि कोव्हिडच्या नियमांचे पालन करा असा संदेश सर्वांना देत आहेत. पण हे सर्व हे कलाकार स्वत; करत आहेत का याचा प्रश्न प्रश्न लोकांना पडला आहे. नुकताच बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूरचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हॅकेशन एन्जोय करायला आलिया आणि रणबीर मालदिवला गेले आहेत. तर आलिया आणि रणबीरच्या आधी बॉलीवूडमधील चर्चेत असलेली जोडी टायगर श्रॅफ आणि दिशा पटानी देखील मालदिवला गेले.

रविवारी सकाळी टायगर श्रॉफला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. तो दिशासोबत मालदीवला रवाना झालाय. यावेळी टायगर निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या कार्गोमध्ये दिसला. दिशा आणि टायगर विमानतळावर वेगवेगळे आले पण बॉलीवूड रोमॅंटिक कपल आलिया आणि रणवीर मात्र एकत्र विमानळावर दाखल झाले यावेळी आलिया आणि रणबीरचा एअर पोर्ट लूक सारख्या रंगाचा होता. आलियाने व्हाईट ड्रेस घातला होता तर रणवीर व्हाईट टी शर्ट घालता होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नेटकऱ्यांनी फोटोंना पसंती दिली तर काहींनी आलिया आणि रणबीरला ट्रोल केले. सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भगनानीने रणबीर आणि आलियाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला एका नेटकऱ्याने कमेंट केले, ‘लोकांना सांगता घरी राहा आणि स्वत; बाहेर फिरता’

रणवीर आणि आलिया दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच बॉलीवूडमधील कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, गोविंदा, आर माधवान, बप्पी लहरी, अक्षय कुमार, आमिर खान, कटरीना कैफ आणि विक्की कौशल या प्रसिध्द बॉलीवुडमधील कालाकारांना कोरोना झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT