tiger shroff in singham again after deepika padukon first look out ajay devgn akshay kumar ranveer singh SAKAL
मनोरंजन

Tiger Shroff Singham Aagain: दीपिका नंतर टायगर श्रॉफची 'कॉप युनिव्हर्स'मध्ये शानदार एन्ट्री, 'सिंघम अगेन' मध्ये झळकणार

रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन मधील टायगर श्रॉफचा पहिला लूक समोर आलाय

Devendra Jadhav

Tiger Shroff Singham Aagain News: रोहीत शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिंघम, सिंबा, सूर्यवंशी अशा सिनेमांमधून रोहीत त्याचं स्वतःचं कॉप युनिव्हर्स तयार करतोय.

अशातच रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडलीय. हा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर रोहीतच्या आगमी सिंघम अगेनमध्ये झळकणार असून त्याचा पहिला लूक समोर आलाय.

(tiger shroff in singham again after deepika padukon first look out ajay devgn akshay kumar ranveer singh)

सिंघम अगेनमध्ये टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील होणार आहे. टायगरचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे. टायगर एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिंघम अगेन मध्ये टायगर एसीपी सत्या म्हणून पहिल्यांदाच समोर येणार आहे.

रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये टायगर सामील होणार आहे. याआधी दीपिका पादुकोण सुद्धा रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सहभागी झाल्याने तिच्या फॅन्सला आनंद झाला. काही मिनिटांपूर्वीच टायगरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले होते, "एसीपी सत्या रिपोर्टिंग ऑन ड्युटी सिंघम सर. #SinghamAgain."

इतके सर्व कलाकार सिंघम अगेनमध्ये एकत्र येत असल्याने सिंघम अगेन जेव्हा रिलीज होईल तेव्हा नक्कीच मजा येईल यात शंका नाही.

दीपिका पादुकोण लेडी सिंघम

नवरात्रीच्या खास मुहूर्तावर दिपीकाने चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव शक्ती शेट्टी आहे. दिपीकापदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिपीकाने पोलिसांचा गणवेश परिधान केलेला आहे.

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण तिच्या बंदुकीसह हसताना दिसत आहे. या क्लोज-अप फोटोत दीपिकाच्या हाताला जखमा झालेल्या आणि कपाळातून रक्त वाहताना दिसत आहे. त्यामुळे हा अॅक्शन सीन्स किती कमालीचा असणार याची चर्चा सुरु आहे.

रोहीतच्या सिंघम अगेनची उत्सुकता शिगेला

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि श्वेता तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपुर्वी करिनाने देखील या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

सिंघम अगेनची शूटिंग सुरु झाली असून हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT