Tiger Shroff  file
मनोरंजन

'गणपत'च्या शूटिंगदरम्यान थोडक्यात बचावला टायगर श्रॉफचा डोळा

टायगरने दुखापतीचा फोटो केला पोस्ट

स्वाती वेमूल

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या आगामी 'गणपत' (Ganapath) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. युकेमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू असून यादरम्यान त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. टायगरने दुखापतीचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याचा डोळा सुजल्याचं पहायला मिळतंय. चित्रपटाच्या सेटवरच त्याने हा फोटो काढल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या शूटिंगदरम्याने काही व्हिडीओ तो सतत सोशल मीडियावरील चाहत्यांसोबत शेअर करतोय. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने 'यु आर माय सोनिया' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता.

'गणपत' या चित्रपटात तो क्रिती सनॉनसोबत मुख्य भूमिका साकारतोय. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करतोय. टायगर आणि क्रितीने 'हिरोपंती' या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं. गेल्या महिन्यातच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. विकास, वाशु भगनानी, दीप्शिका देशमुख आणि जॅकी भगनानी या चौघांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

फिटनेसच्या बाबतीत सजग असलेल्या जॉन अब्राहम, विद्युत जामवाल, सोनु सूद, अक्षय कुमार या मोजक्या स्टार्समध्ये टायगर श्रॅाफचंही नाव घेतलं जातं. पीळदार शरीरयष्टी, रूबाबदार व देखणं व्यक्तिमत्व असलेला टायगर श्रॉफ हा असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या भूमिकेसाठी कुठलीही कसूर न सोडणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांमध्ये तो टॉपवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल, धर्मेंद्र प्रधान यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री? कोणत्या मंत्र्याला मिळणार डच्चू?

Raju Navghare: आमदार राजू नवघरे नाशिक-अहिल्यानगर दौऱ्यावर; विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा घेणार आढावा

Phulambri Medical Waste: सार्वजनिक ठिकाणी सिरिंज, इंजेक्शनच्या बाटल्या; फुलंब्रीतील शिवमनगरी परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

SCROLL FOR NEXT