timepass 3 hruta durgule and her mother in law mugdha shah husband prateek shah came in premier show  sakal
मनोरंजन

Timepass 3: हृता दुर्गुळेच्या अभिनयावर सासूबाई खुश, प्रीमियर शो वेळी थेट..

शुक्रवारी timepass 3 या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला हृताच्या सासूबाई मुग्धा शाह देखील हजर होत्या.

नीलेश अडसूळ

Timepass 3 : 'दगडू पराजु आणि पालवी'च्या लव्ह ट्रँगलचा लोचा म्हणजेच 'टाइमपास ३' हा दमदार चित्रपट शुक्रवारी २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचाप्रीमियर शो शुक्रवारी मुंबई पार पडला. या शोला मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. चित्रपटानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळे , प्रथमेश परब आणि रवी जाधव यांचे सर्वांनीं भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे या प्रीमियर शोला हृताचा नवरा प्रतीक शाह आणि सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह या देखील हजेर होत्या. यावेळी चित्रपट पाहून मुग्धा शाह आपल्या सुनबाईंवर भलत्याच खुश झाल्या. त्यांचा एक गोड व व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (timepass 3 hruta durgule and her mother in law mugdha shah husband pratik shah came in premier show)

टाइमपास 3 च्या प्रीमियर शोमधील हृता आणि मुग्धा शाह या सासू सुनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या दोघीही अत्यंत स्टायलीश अंदाजात दिसत आहेत. मुग्धा आणि हृता सासू सुना कमी आणि मैत्रिणीच जास्त वाटत आहेत,अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. चित्रपट हृताचा असला तरी सूनेच्या नव्या चित्रपटासाठी सासूबाईच अधिक खुश असल्याचं दिसत होतं.

यामध्ये मुग्धा शाह हृताला अत्यंत प्रेमाने मिठी मारताना दिसतात. तर यावेळी हृताचा नवरा प्रतीक शाह देखील भलताच आनंदी पाहायला मिळाला. हृताच्या या यशात तिच्या सासरचे सर्वजण सामील झाल्याचे पाहून अनेकांना आनंद मिळाला आहे. आणि हे सासू सुनेचे प्रेम पाहून चाहतेहि आनंदून गेले आहेत. हृताची सासू मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT