prathamesh parab, prathamesh parab girlfriend, prathamesh parab movies SAKAL
मनोरंजन

Prathamesh Parab: मला वेड लागले प्रेमाचे! गर्लफ्रेंड सोबत दगडू झाला रोमँटिक

प्रथमेश परबची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरचा आज वाढदिवस आहे

Devendra Jadhav

Prathamesh Parab News: मला वेड लागले प्रेमाचे म्हणत दगडू टाईमपास सिनेमात प्राजु सोबत रोमँटिक झाला. हाच दगडू म्हणजेच प्रथमेश परब खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकाच रोमँटिक झालाय.

प्रथमेश परबची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने प्रथमेश लाडक्या गर्लफ्रेंडसोबतचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलाय.

(timepass fame actor prathamesh parab turn romantic with his girlfriend)

प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबतच व्हिडिओ शेयर केलाय. क्षितिजाला शुभेच्छा देताना प्रथमेश लिहितो.. 'निरागसता', तुझं सौंदर्य, अशीच हसरी जगत रहा, कधी शहाणपण - कधी लहानपण, निखळ निर्मळ वागत रहा !!

अशा रोमँटीक शब्दात प्रथमेशने क्षितिजाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा सोबतचं नातं सर्वांसमोर उघड केलंय.

प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर हि बायोटेक्नोलॉजिस्ट आहे. याशिवाय ती लेखिका आहे. ती एक NGO सुद्धा चालवते.

क्षितिजा आणि प्रथमेश गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं.

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो 'टाइमपास' मधला दगडू.

नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.

खऱ्या आयुष्यात प्रथमेशने त्यांची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर सोबत काही फोटो काही दिवसांपूर्वी शेयर केले होते. क्षितिजा टाइमपास 3 च्या प्रीमियरला देखील हजर होती. त्यामुळे प्रथमेश आणि क्षितिजा दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत याचा उलगडा झाला.

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये लग्न केलं. हार्दिक जोशी - अक्षया देवधर नंतर प्रथमेश परब आणि क्षितिजा हे गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड कधी लग्न कळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

प्रथमेश सध्या मराठी इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सिनेमे करतोय. याशिवाय प्रथमेश अजय देवगणच्या दृश्यम 2 सिनेमात दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT