Tina Datta Esakal
मनोरंजन

Tina Datta: शुटिंग दरम्यान तब्येत बिघडल्याने बिग बॉस फेम अभिनेत्री रुग्णालयात, दिली हेल्थ अपडेट

Vaishali Patil

Tina Datta News: टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आगामी काळात ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूट आणि कामाशी संबंधित पोस्ट करत असते.

टीना ही 'हम रहे या ना रहे' या मालिकेत काम करत आहे. दरम्यान या मालिकेच्या सेटवर शुट करत असतांना ती आजारी पडली होती.

टीनाला अचानक तिची प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना तिच्या आरोग्याची काळजी होत होती.

आता टिनाने तिच्या चाहत्यांसोबत तिच्या तब्येतीविषयी अपडेट शेयर केली आहे. टिनाने सांगितले आहे की तिला आता पूर्वीपेक्षा चांगलं वाटत आहे.

Tina Datta News

टीनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिते की, 'गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण गेले. प्रकृती खराब झाल्यामुळे मला रुग्णालयात दाखल करावं लागलं, पण या अडचणीच्या काळात तुम्ही सर्वांनी प्रार्थना केल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे.

माझ्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारलं. मला आता डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरी आहे.'

आता टिनाची प्रकृती चांगली असल्याने तिचे चाहते खुश आहेत. मात्र अद्याप टिनाला नेमकं काय झालं होतं याचा खुलासा तिने केलेला नाही.

सध्या टिना 'हम रहे ना रहे हम' या मालिकेत जय भानुशालीसोबत काम करत आहे. या मालिकेत त्या दोघांव्यतिरिक्त करणवीर बोहरा देखील आहे.

टिना 'उतरन' या मालिकेतुन लोकप्रियतेच्या झोतात आली होती. त्यानंतर ती बिग बॉस 16 मध्येही दिसली. टिना सोशल मिडियावर सक्रिय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT