Titanic Movie  esakal
मनोरंजन

Titanic Movie :टायटॅनिक चित्रपटासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी दिली होती आत्महत्येची धमकी!

टायटॅनिक बनवण्यासाठी इतका आलाय खर्च?

सकाळ डिजिटल टीम

टायटॅनिक चित्रपटाच्या अनेक आठवणी भारतातील तरूण वर्गाकडे आहेत. कारण, हॉलिवूडचे चित्रपट डब करून आपल्याकडे दाखवले जातात. त्यामूळे सध्या ३५ शीत असलेल्या अनेकांना टायटॅनिक हा चित्रपट तोंडपाठ झाला असेल.

या चित्रपटाला आजच्याच दिवशी एक दोन नव्हे तर तब्बल ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला त्याला अनेक पुरस्कार मिळाले की कलाकारांपेक्षा अधिक कौतूक त्याच्या दिग्दर्शकाचं होतं. कारण, त्याने तो चित्रपट जन्माला घातलेला असतो.

टायटॅनिकचे इतके कौतूक होण्यामागेही दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांचाच हात आहे. कारण, या चित्रपटासाठी जेम्स कॅमरून यांची आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती. नक्की काय प्रकार होता हे पाहुयात.

दिग्दर्शक जेम्स आणि कलाकार

या 15 एप्रिल 1912 साली ‘टायटॅनिक’ जहाज नॉर्थ अॅटलांटिक ओशनमध्ये एका हिमनगाला धडकून बुडाले होते. त्यावर सिनेमा तयार करताना अनेक विक्रम झाले होते. या चित्रपटाने कमाईचेही सर्व विक्रम तोडले होते. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या सांगण्यावरून खऱ्या बुडालेल्या जहाजाचा शोध घेऊन त्यात डायव्हिंग करून डिझाईन तयार केले गेले.

जहाज बुडताना दाखविण्यासाठीच्या एका सिनमध्ये 1 करोड़ लिटर पाण्याचा वापर केला होता. 3 तास 10 मिनिटांच्या या चित्रपटाला 200 मिलियन डॉलर म्हणजे 1250 कोटी रुपये खर्च आला होता.

जेम्स कलाकारांनी सीन समजावताना

या चित्रपटाची नायिका रोझ ( केट विंसलेट ) हीला जीवदान देण्यासाठी नायक जेम्स ( लिओनार्डा डिकाप्रिओ ) याला मरताना का दाखविले होते. नायक वाचायला हवा होता, यावर जेम्स म्हणाले होते की, आम्ही पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडी दरवाजाची चाचणी केली होती. तो दरवाजा दोघांचे वजन पेलण्यास सक्षम नव्हता त्यामूळेच एकाला वाचवणे गरजेचे होते. तेव्हा रोझला जीवनदान मिळाले असे दाखवण्यात आले.

 

हा चित्रपट दोन तासांचा असावा तरच जास्त चालेल, असे असे निर्मात्यांचे म्हणणे होते. पण, जेम्स यांना तो तीन तासांचा असावा असे वाटत होते. त्यावर वाज झाल्याने जर या चित्रपटाचा वेळ मी म्हणेल तितका नसेल तर मी आत्महत्या करेन, अशी धमकीच जेम्स यांनी निर्मात्यांना दिली होती.  

जेम्स सारख्या धडाडीच्या दिग्दर्शकामूळेच टायटॅनिक सारखा इतिहास घडवणारा चित्रपट तयार झाला. आणि त्याने अनेक विक्रम नावावर केले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT