tmkoc actor Rakesh Bedi big scam, robbed by thief in name of Indian Army SAKAL
मनोरंजन

Rakesh Bedi: "तारक मेहता..चष्मा" मधील ज्येष्ठ अभिनेत्याची मोठी फसवणूक, भारतीय सेनेच्या नावाखाली चोराने लुटलं

राकेश बेदी यांची मोठी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय

Devendra Jadhav

Rakesh Bedi News: कालच आम्ही तुम्हाला बातमी दिली की, हिंदी - मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंजली पाटीलची तब्बल ५ लाखांची फसवणुक झाली. आता मनोरंजन विश्वातून आणखी एक मोठी बातमी समोर येतेय.

टीव्ही आणि बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी हे एका फोन स्कॅमचे बळी ठरले असून त्यांची 75,000 रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्याने इंडियन आर्मीच्या नावाखाली राकेश यांना लुटलं. वाचा नेमकं काय घडलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राकेश बेदी यांना भारतीय लष्करातील ऑफीसर असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. पुढे त्याने सांगितले की, त्याला राकेश यांच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये रस आहे.

पुढे राकेश यांनी विश्वासाने त्या व्यक्तीच्या खात्यात 75,000 रुपये ट्रान्सफर केले होते. पण आपली फसवणूक झालीय असं राकेश यांच्या लक्षात आलं. "असे चोरटे रात्रीच्या वेळी फोन करतात. जेणेकरून आपली फसवणूक झाल्याचे कोणाच्या लक्षात आले तरी तक्रार दाखल करण्यास उशीर होतो," असं राकेश म्हणाले.

राकेशने पोलिसांना फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे तपशील त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, फोटो आणि व्यवहाराचे तपशील दिले आहेत. राकेशच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्याला सांगितले की, असे प्रकार अनेक दिवसांपासून होत आहेत.

सुदैवाने मी जास्त पैसे गमावले नाहीत.अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा राकेश बेदी यांनी दिला आहे. राकेश बेदी म्हणाले की, अनेक घोटाळेबाज लष्कराचे जवान असल्याचे भासवून फसवणूक करत आहेत.

राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, घोटाळेबाजाने त्यांची 75,000 रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांनी सांगितले की, मी मोठ्या नुकसानीतून वाचलो आहे. लष्कराच्या नावावर फसवणूक करणाऱ्या अशा लोकांना टाळावे, असे आवाहन त्यांनी केलंय.

राकेश गेल्या 4 दशकांपासून पडद्यावर दिसत आहेत. त्यांनी चश्मे बद्दूर, खट्टा मीठा आणि प्रोफेसर की पडोसन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय राकेशने ये जो है जिंदगी, श्रीमान श्रीमती, तारक मेहता का उल्टा चष्मा यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचा फटका? कुलदीपने का केली नाही Warm-up मॅचच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी, नेमकं काय घडलं?

परदेशातलं सुख सोडून भारतात का परतली मृणाल दुसानिस? मालिका नाही तर 'या' दोन गोष्टी ठरल्या कारण; म्हणाली-

Narayangaon Crime : श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र गोळीबार प्रकरणातील एक जणाला अटक; अटक आरोपी कुविख्यात गुन्हेगार

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

SCROLL FOR NEXT