Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Latest Update 
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: आता कोण करणार 'रोशन भाभीची' भूमिका, जेनिफर मिस्त्रीच्या जागी कुणाची वर्णी?

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या मालिकांमध्ये तारक मेहता का उल्टा चष्माचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Latest Update : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या मालिकांमध्ये तारक मेहता का उल्टा चष्माचे नाव घ्यावे लागेल. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यातील पात्रं ही आता चाहत्यांच्या मनात घर करुन बसली आहेत. अशात एक नवी बातमी या मालिकेच्या संदर्भात पुढे आली आहे.

बऱ्याच काळापासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या पुढे आल्या आहेत. त्यातील एक एक कॅरेक्टर हे नेहमीच चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी हा शो बॉयकॉट करावा अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याचे कारण दयाबेनच्या इंट्रीबाबत होता. त्या मालिकेमध्ये दयाबेनची इंट्री अद्याप न दर्शवल्यानं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती.

या सगळ्यात पुन्हा एक बातमी समोर आली आहे. तारक मेहता मालिकेतील अनेक कलाकारांना रिप्लेस करण्यात येत आहे. त्या जागी नवे कलाकार येत आहेत. याचा मोठा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होताना दिसतो आहे. आता आणखी एका प्रसिद्ध व्यक्तिरेखेच्या भूमिकेची रिप्लेसमेंट होताना दिसते आहे. ती आहे मिसेज रोशन सिंह सोढी यांची. मोनाज मेवावाला ही त्यांची भूमिका करणार आहे. ती आहे तरी कोण, हे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

तारक मेहतामध्ये पहिल्यांदा मिसेस सोढी यांची भूमिका जेनिफर मिस्त्री यांनी साकारली होती. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये ती भूमिका सोडली. आता त्यांची जागा मोनाज मेवावाल घेणार आहे. मोनाज यापूर्वी अनेक टीव्ही शोमध्ये झळकली आहे. फिरदौस मेवावाला आणि आशा फिरदौस ही तिचे आई वडील आहेत. फिरदौस हे देखील अभिनेते आहेत.

मोनाजनं यापूर्वी मीत मिला दे रब्बा आणि रिश्तो की डोर सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती साल्सा डान्सर म्हणूनही लोकप्रिय आहे. मोनाजनं २००४ मध्ये तिच्या करिअऱला सुरुवात केली होती. किट्टी पार्टी नावाच्या मालिकेतून तिनं सुरुवात केली होती. त्यानंतर ती स्टँडअप कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कॉमेडी शो मध्ये देखील सहभागी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT