Nayantara news  esakal
मनोरंजन

Nayanthara-Vignesh Shivan- लग्न होऊन दोनच दिवस झाले, मागितली माफी!

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Nayanthara-Vignesh Shivan Apology - टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी मोठ्या जल्लोषात (Bollywood news) तिचं लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. नयनतारानं तिचा मित्र विघ्नेशशी लग्न केलं. या (Tollywood Actress Nayantara) सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी नयनतारा आणि विघ्नेश हे तिरुपती बालाजीला गेले होते. ते जेव्हा भगवान तिरुपतीच्या मंदिराजवळ गेले तेव्हा तिथे त्यांचा वाद झाला. त्यामुळे या जोडप्याला माफी मागावी लागली आहे. असं काय झालं होतं की, या दोन्ही सेलिब्रेटींना तेथील मंदिर प्रशासनाची माफी मागावी लागली? नयनताराच्या चाहत्यांनी तिला यावरुन वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण केल्याचे दिसून आले आहे.

9 जुनला नयनतारा आणि विघ्नेशचं चैन्नईतील महाबलीपुरम येथे लग्न झालं. त्या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर ट्रेडिंगचा विषय आहे. बॉलीवूड आणि (Bollywood vs tollywood) टॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी या जोडप्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. हे दोघेजण जेव्हा तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा त्यावरुन मोठा वाद झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना माफी मागावी लागली आहे. भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील कल्याणोत्सवात भाग घेण्यासाठी नयनतारा त्या मंदिरात गेली होती. त्यावेळी तिनं तिनं फोटोशुट केलं. जेव्हा ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यात नयनतारानं फोटोशुट करताना चप्पल घातली होती. मंदिरात चप्पल आणि बुट घालून जाणं निषिद्ध आहे.

नयनतारा आणि विघ्नेशनं त्या नियमांचे उल्लंघन केल्यानं मंदिर प्रशासनानं नाराजी व्यक्त केली. आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले. तोपर्यत ही बातमी सोशल मीडियावरुन सगळीकडे व्हायरल झाली होती. सुरुवातीला माफी मागण्यास आढेवेढे घेणाऱ्या या कपल्सला जेव्हा कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली तेव्हा त्यांनी रीतसर माफी मागून हे प्रकरण मिटवावे. अशी मागणी प्रशासनाकडे केली होती.

आपल्या प्रतिक्रियेमध्ये विघ्नेश शिवननं सांगितलं आहे की, आम्हाला नेहमीच तिरुपतीच्या मंदिरात लग्न करण्याची इच्छा होती. जेव्हा आम्ही त्याठिकाणी दर्शनासाठी गेलो तेव्हा तेथील लोकांनी आमच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी आमच्या लक्षात चप्पल आणि बुटांचे लक्षात राहिले नाही. त्यावरुन जो गोंधळ झाला. त्याबद्दल आम्ही मंदिर प्रशासनाची आम्ही माफी मागतो. असे त्यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT