Tollywood actress samantha ruth prabhu  esak
मनोरंजन

Samantha: बॉलीवूडच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, आकडा मोठा!

बॉलीवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकण्यात टॉलीवूडची एक अभिनेत्री यशस्वी झाली आहे. तिचे नाव आहे समंथा रुथ प्रभु.

युगंधर ताजणे

Samantha's Luxurious Life: बॉलीवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकण्यात टॉलीवूडची एक अभिनेत्री यशस्वी झाली आहे. तिचे नाव आहे समंथा रुथ प्रभु. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिचा चैतन्य नागार्जुनशी घटस्फोट झाला. (Naga Chaitanya) टॉलीवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध असणारं हे कपल जेव्हा वेगळं झालं तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. समंथानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन आपण नागा चैतन्यापासून वेगळं होत असल्याचे सांगितले होते. नागा चैतन्यानं देखील सोशल मीडियावर तसेच काही मुलाखतींमध्ये समंथाविषयी वेगवेगळ्या (Bollywood Actress) प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. त्यानंतर काही दिवसांतच तिचा पुष्पा (Pushpa Movie) हा चित्रपट आला. त्यामध्ये तिनं एक आयटम साँग केलं होतं. त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

समंथा (Samantha Ruth Prabhu) ही बॉलीवूडच्या अभिनेत्रींपेक्षा अधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याचे दिसून आले आहे. तिचं मानधन हे बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत त्याच्याहून अधिक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तीन (Tollywood News) मिनिटांच्या गाण्यासाठी समंथा पाच कोटींपर्य़त मानधन घेत असल्याची माहिती आहे. पुष्पा द राईज या अल्लु अर्जुनच्या चित्रपटात तिनं ऊ अंटावा गाण्यात आयटम साँग केले होते. त्या गाण्यावरुन नव्या वादाला देखील (entertainment news) तोंड फुटले होते. समंथानं बोल्ड लूकमध्ये ते गाणं केलं होतं. तिच्या चाहत्यांना समंथाचा तो अंदाज भलताच भावला होता. एका चित्रपटासाठी समंथाचे मानधन 5 ते 10 कोटींच्या दरम्यान आहे. यावरुन तिच्या सेलिब्रेटीपणाचा अंदाज येतो.

समंथाची एकुण संपत्ती ही 80 कोटींच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबईमध्ये नवे अलिशान घर खरेदी केले होते. तिला महागड्या गाड्यांची भारी हौस आहे. माया चेसवे या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. समंथा ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकतीच ती विजय सेतुपतीबरोबर एका चित्रपटामध्ये दिसली आहे. त्यात नयनतारा ही अभिनेत्री देखील आहे. नागा चैतन्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्याकडून दोनशे कोटींची पोटगी समंथानं नाकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT