Tollywood: Ramcharan reveals Prabhas Girlfirend secret. Google
मनोरंजन

Prabhas: 'ना बॉलीवूड..ना टॉलीवूड..', प्रभासच्या गर्लफ्रेंडविषयी साऊथ सुपरस्टार रामचरणचा मोठा खुलासा..

प्रभास आणि रामचरण हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. एका टॉक शो दरम्यान रामचरणनं प्रभासच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Prabhas: सिनेमाच्या जगातला 'बाहुबली' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभासची गर्लफ्रेंड कोण याविषयी अजुनही सगळ्यांच्या मनात उत्सुकता कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली आहे. क्रिती सननसोबत प्रभासचं अफेअर सुरु आहे असं देखील बोललं जात होतं.

पण क्रितीनंच पोस्ट करत असं काही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दोघांनी 'आदिपुरुष' हा सिनेमा एकत्र केला आहे. त्यामुळे बातमी होती की प्रभासनं सिनेमाच्या सेटवर क्रितीला प्रपोज केलं होतं. पण आता साऊथ सुपरस्टार आणि आरआरआर फेम रामचरणने खुलासा केला आहे ज्यामुळे लाखो चाहत्यांचे मन मात्र तुटण्याची शक्यता आहे.(Tollywood: Ramcharan reveals Prabhas Girlfirend secret.)

प्रभास काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध टॉक शो मध्ये पोहोचला होता. शोच्या एका भागात प्रभासच्या आयुष्यातील सीक्रेट्स जाणून घेण्यासाठी रामचरणला फोन लावला गेला होता. आता या फोन कॉलच्या भागाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रामचरण स्पष्ट शब्दात प्रभासच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सीक्रेट सांगतान दिसतो. तो म्हणालाय,'प्रभास हा अद्याप सिंगल आहे आणि त्याचे कोणाशीही अफेअर सुरु नाही'.

प्रभासचा हा एपिसोड नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये प्रभासच रामचरणला फोन लावताना दिसतो. आणि स्वतःच रामचरणला विचारतो की माझ्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का? तेव्हा रामचरण पटकनं म्हणतो की,''सध्या प्रभासच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नाही''. यावरनं प्रभासची थोडी मस्करी करत तो म्हणतो,''पण कदाचित प्रभास लवकरच ही गूडन्यूज देऊ शकतो''. जसं रामचरणने हे म्हटलं तसं लागलीच प्रभासही म्हणाला,''अरे माझा मित्र आहेस की शत्रू..''

शो च्या दरम्यान प्रभास आणि रामचरणचं बॉन्डिंग पाहून चाहते एकदम खूश झाले. एका चाहत्यानं लिहिलं की, 'यांच्यातील बॉन्डिंग खूप छान आहे'. तर आणखी एकानं लिहिलं की,'संपूर्ण शो मधील हा खूप चांगला भाग होता. आम्हाला माहित नव्हतं की हे दोघे इतके चांगले मित्र आहेत'.

प्रभासच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर त्याचा 'सालार' सिनेमा लवकरच भेटीस येत आहे. 'केजीएफ'ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर दिग्दर्शक प्रशांत नील कडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. या सिनेमात श्रृती हसन पहिल्यांदाच प्रभासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

तसंच, आता सगळेच प्रेक्षक प्रभास,सैफ अली खान आणि क्रिती सननच्या 'आदिपुरुष' सिनेमाची देखील प्रतिक्षा करत आहेत. 'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच तो सिनेमा वादात पडला आहे. बोललं जात आहे की २०२३ च्या मध्यावर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT