मनोरंजन

अल्लु अर्जुनच्या सात वर्षाच्या अयानचा 'वर्क आऊट'; व्हिडिओ व्हायरल

टॉलीवूडमधील सुपरस्टार म्हणून अल्लु अर्जुन ओळखला जातो.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टॉलीवूडमधील सुपरस्टार म्हणून अल्लु अर्जुन ओळखला जातो. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील त्याच्या चित्रपटांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो. तो वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्येही सहभागी झाल्याचे दिसून येते. अशावेळी त्याच्या त्या व्हिडिओंना चाहत्यांना तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. आता त्याच्या सात वर्षाच्या अयानचा जीम करतानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. अल्लुच्या चाहत्यांनी अयानचं तोंडभरुन कौतूक केलं आहे.

अल्लु अयान सोशल मीडियावरुन चाहत्यांची पसंती मिळवत असतो. त्याच्या लेटेस्ट व्हिडिओला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये अयानचा वर्कआऊट व्हायरल झाला आहे. त्याचं झालं असं अयानचे काका वरुण तेज हे आपल्या गनीला प्रमोट करण्यासाठी एक प्रमोशन व्हिडिओ तयार करत होते. त्यावेळी त्यांना अयानचाही व्हिडिओ तयार करावा अशी कल्पना सुचली आणि त्यांनी ती अंमलात आणली. सध्या तो व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. सात वर्षाच्या अयानच्या त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी त्याला मनपूर्वरक शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी अल्लुपेक्षाही मोठं नाव कमावण्याचा सल्ला दिला आहे.

त्या व्हिडिओमध्ये अयाननं आपल्या काकाची नक्कल केली आहे. जी प्रेक्षकांना कमालीची आवडली आहे. आतापर्यत या व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळाले आहे. चाहत्यांनी त्याला छोटा गनी अशी उपमा दिली आहे. गनी ही एक स्पोर्टस ड्रामा मुव्ही आहे. किरण कोर्रापती लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सई मांजरेकर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर वरुण तेज हा एका बॉक्सरच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी गनी अंथम रिलिज केले होते. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT