Samantha esakal
मनोरंजन

Samantha: आजारपणातही संमथा पोहचली ‘यशोदा’च्या प्रमोशनसाठी!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. मागील काही दिवसांपासून ती खुप चर्चेत आहे. समंथाला मायोसायटिस या आजारानं ग्रासल्याची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यासगळ्यात समंथाचा यशोदा नावाचा चित्रपटही चर्चेत आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. मात्र संमथाला झालेल्या आजारामुळे ती या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण केवळ निर्माता, दिग्दर्शकच नाही तर खुद्द समंथाही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नसल्याचं दिसत आहे.

आजाराशी झुंज देत असतांनाही संमथा 'यशोदा'च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचल्याचं समजतयं. समंथा रुथ प्रभूने तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटसाठी तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. आजारपणानंतरही चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटला जाण्यामागे तिचा मित्र राज निदिमोरू याने प्रेरित केल्याचं तिनं म्हंटलय. या फोटोत ती चष्मा घालून काळा पॅन्टसूट परिधान करत पोझ देत आहे, परंतु एकाही चित्रात ती हसतांना दिसत नाही. या फोटोमधुन ती किती अशक्त झालीय तसेच या आजाराचे परिणाम तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहेत.

हेही वाचा: का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

 सामंथला इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिले की, 'माझा चांगला मित्र राज निदिमोरू म्हणतोय, दिवस काहीही असो आणि कितीही खराब गोष्ट असो, शॉवर...शेव...शोअप! हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. यशोदा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी ते एका दिवसासाठी उधार घेतलं होते. 11 तारखेला भेटू.'

तिचा यशोदा हा चित्रपट हरी-हरीश यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय तेलुगु-भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर आहे. यात उन्नी मुकुंदन, वरलक्ष्मी सरथकुमार आणि मुरली शर्मा यांच्यासोबत सामंथा मुख्य भूमिकेत आहे. यात सामंथा सरोगेट आईची भूमिका साकारणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT