Tom Cruise  esakal
मनोरंजन

Tom Cruise : टॉम क्रूझपुढे सलमानही फिका! 61 व्या वर्षी ब्रेकअप? 25 वर्षांनी लहान असणाऱ्या गर्लफ्रेंडला अलविदा

Tom Cruise : टॉम क्रूझ आणि त्याची गर्लफ्रेंड एल्सिना खैरोवा (Elsina Khayrova ) यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

priyanka kulkarni

Tom Cruise : हॉलिवूडमधील सुपरस्टार टॉम क्रूझचे (Tom Cruise) चाहते जगभरात आहेत. टॉम हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या टॉम क्रूझ हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 61 व्या टॉम क्रूझचा ब्रेकअप झाला आहे. टॉम क्रूझ आणि त्याची गर्लफ्रेंड एल्सिना खैरोवा (Elsina Khayrova ) यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॉमनं एल्सिनाचे फोटो डिलीट केले

टॉम क्रूझने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे, असं म्हटलं जात आहे. टॉम आणि एल्सिना खैरोवा हे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 13 फेब्रुवारी रोजी, टॉमने सोशल मीडियावर एल्सिना खैरोवासोबतच्या नात्याची घोषणा केली. या घोषणेच्या अवघ्या 10 दिवसांनी टॉमनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. टॉम क्रूझने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एल्सिना खैरोवाचा फोटोही डिलीट केले आहेत.

टॉमने एल्सिनाच्या मुलांची घेतली भेट

टॉम आणि एल्सिना यांच्या वयात 25 वर्षांचे अंतर आहे. टॉम आणि एल्सिना यांच्या ब्रेकअपची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काही लोक म्हणतात की टॉम क्रूझने एल्सिना खैरोवाचा हार्ट ब्रेक केला आहेत. टॉम आणि एल्सिना हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये एकत्र राहत आहेत. टॉमने एल्सिनाच्या मुलांचीही भेट घेतली.

...म्हणून टॉम आणि अल्सीनाच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली

एका इंग्रजी वेबसाइटनुसार, टॉम क्रूझ आणि अल्सीना खैरोवा यांना लंडनमध्ये एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या गाला डिनर दरम्यान स्पॉट करण्यात आलं. पण या कार्यक्रमात ते एकत्र दिसले नाहीत. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या पसरू लागल्या.

टॉमनं तीन वेळा थाटला संसार

टॉम क्रूझनं तीन वेळा लग्न केलं आहे. टॉम क्रूजला या लग्नांमधून तीन मुलेही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT