Jasmin Bhasin Esakal
मनोरंजन

Jasmin Bhasin: 'मम्मीला विचारावं लागेल', लग्नाच्या प्रपोजलवर जास्मिनचं उत्तर; 'तो' बिचारा शॉक

सकाळ डिजिटल टीम

टिव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली जास्मिन भसीन ही तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. तिला बऱ्याचदा अली गोनीसोबत स्पॉट केलं जाते. दोघांची लव्ह स्टोरीही बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. दोघेही एकमेकांसोबत कपल गोल शेअर करतात त्याचबरोबर त्याचे फोटोज आणि व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पण त्याच्या लव्ह स्टोरीत आता टोनी कक्करची एंट्री झाली आहे.

त्याच्या एका पोस्टने दोघांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टमध्ये टोनी कक्कर जस्मिनला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. टोनीने सोशल मीडियावर बिग बॉस 13 फेम जस्मिनला लग्नाची मागणी घातली आहे.

खरं तर गायक टोनी कक्करने त्याच्या इंस्टाग्रामवर जास्मिन भसीनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो जस्मिन भसीनकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, तू लग्न करशील का? टोनीच्या या पोस्टवर जस्मिन भसीन 'मी माझ्या आईला विचारून सांगेन' असं उत्तर दिलयं.

यासोबतच जस्मिनने हसणारा इमोजीही टाकला आहे. तर टोनीच्या या पोस्टवर कमेंट करताना त्याची बहीण नेहा कक्करने लिहिले आहे, 'अब तो कर ही लो शादी भय्यू.' या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

ही बातमी ऐकल्यानंतर जस्मिनचे चाहते नाराज मात्र झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर दोघांचे चाहते समोरासमोर आले आहेत. या पोस्टवर कमेंट करताना जस्मिन भसीनच्या एका चाहत्याने लिहिले, 'नाही..'. दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले, 'जस्मिन अलीसोबतच चांगली दिसते' तर टोनीच्या चाहत्यांनी लिहिले की, 'चांगली बातमी आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आम्ही लग्नाला येत आहोत.'

टोनी कक्करने या पोस्टमध्ये इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याच्या पुढील गाण्याच्या प्रोजेक्टमध्ये दोघेही एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दोघांच्या या म्युझिक व्हिडिओची झलक टोनीने सोशल मिडियावर यापूर्वीच शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Plastic Scrap Fire: प्लास्टिकच्या साठ्याला हवा नियमांचा अंकुश अग्निप्रतिबंधक, प्रदूषण नियंत्रण परवानगी सक्तीची करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT