sushant singh rajpiut news
sushant singh rajpiut news  Team esakal
मनोरंजन

'न्याय द जस्टीस' मधून उलगडणार सुशांतच्या आत्महत्येचे रहस्य ?

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग (bollywood actor sushant singh rajput) राजपूतच्या मृत्युमागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या आत्महत्येला आता एक वर्षे पूर्ण (sucide case completed one year) होणार आहेत. त्यानिमित्तानं त्याच्या आयुष्यावर न्याय द जस्टीस (nyay the justice) नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याच्या ट्रेलरचा वादही कोर्टात गेला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही अनेक वाद समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ट्रेलर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सुशांतच्या आत्महत्येनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ( trailer released of nyay the justice based on sushant singh rajput life)

न्याय द जस्टीस च्या ट्रेलरची (trailer) सुरुवात एका न्यूज रुमपासून होते. ज्यात महेंद्र सिंग नावाच्या अभिनेत्यानं घरात आत्महत्या केल्याची बातमी समोर येते. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांनी त्या घटनांचे वार्तांकन केले होते. त्याच प्रकारे ट्रेलरमध्येही ते पाहायला मिळते. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आतापर्यत तीन वेगवेगळ्या तपासयंत्रणांकडे दिल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येमागील ठोस कारण पुढे आलेले नाही.

तो ट्रेलर पाहून चित्रपटामध्ये देखील सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असणार आहे असा अंदाज प्रेक्षकांनी बांधण्यास सुरुवात केली आहे. सुशांतसिंग राजपुतच्या वडिलांनी न्याय द जस्टीस सारख्या आणखी चार चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. कारण हे सर्व चित्रपट सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर आधारित आहे.

10 जुनला दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश संजीव नरुला यांनी सुशांतच्या वडिलांची चित्रपटांवरील बंदीची याचिका रद्द केली होती. आता त्यानंतर न्याय द जस्टीसचा ट्रेलर आला आहे. ट्रेलरमध्ये बॉलीवूडमधील वातावरण, सेलिब्रेटींची चर्चा, पैसा, क्राईम, नशा, ग्लॅमर अशा सर्व प्रकारच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणा-या काळात प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

या चित्रपटामधील स्टारकास्ट तगडी आहे. त्यात जुबेर खान (juber khan) आणि श्रेया शुक्ला (shreya shukla) यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय असरानी, शक्ति कपूर, अमन वर्मा यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT