trailer of Sandeep Aur Pinky Faraar casting arjun kapoor and Parineeti Chopra
trailer of Sandeep Aur Pinky Faraar casting arjun kapoor and Parineeti Chopra 
मनोरंजन

Trailer : इशकजादे अर्जुन-परिणीती पुन्हा एकत्र; पिंकी-संदीप बनून घालणार धिंगाणा

वृत्तसंस्था

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा "इशकजादे' आणि "नमस्ते इंग्लंड'सारख्या चित्रपटात एकत्र झळकले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंतीस पडली. 

आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "संदीप और पिंकी फरार' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर परिणिती आणि अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरवरून अर्जुन पिंकी दहिया ही भूमिका साकारत असून परिणिती संदीप कौरची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.

एका मोठ्या घोटाळ्यात अडकलेली संदीप कौर (परिणिती चोप्रा) काय काय गोंधळ घालते आणि तिच्या सोबत सतत असणारा पिंकी (अर्जुन कपूर) तिला शेवटुपर्यंत कशी साथ देतो हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. 

या आगळ्या-वेगळ्या कथेचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे. हा चित्रपटकथा ब्लॅक कॉमेडी असणार असून 20 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT