Weddingcha Shinema
Weddingcha Shinema 
मनोरंजन

‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळवृत्तसेवा

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल (ता. 26) प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने हा एक भरपूर मनोरंजनाने भरलेला चित्रपट असेल, याची खूणगाठच बांधली गेली आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची खमंग फोडणी असा हा एकूण मामला असेल, हे ट्रेलर पाहताक्षणी पटते. 

 पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ 12 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला. एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्रीवेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे हे आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील डॉ. सलील कुलकर्णी यांचे सहकारी आणि कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’चीच कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT