Tripti Dimri breakup? Relationship with Anushka Sharma's brother karnesh sharma SAKAL
मनोरंजन

Trupti Dimri Divorce: कला फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचा ब्रेकअप? अनुष्का शर्माच्या भावाशी रिलेशनशीप

तृप्तीने कला सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. तृप्ती अनुष्का शर्माचा भाऊ आणि चित्रपट निर्माता कर्णेश शर्माला डेट करत होती.

Devendra Jadhav

Tripti Dimri Divorce News: नेटफ्लिक्स वरचा कला सिनेमा खुप गाजला. याच सिनेमातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचा घटस्फोट झालाय.

तृप्तीने कला सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. तृप्ती अनुष्का शर्माचा भाऊ आणि चित्रपट निर्माता कर्णेश शर्माला डेट करत होती.

दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नसतानाही अनेकवेळा त्यांच्या फोटोंमधून हिंट्स दिल्या. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, तृप्ती आणि कर्णेश शर्माचे ब्रेकअप झाले आहे.

(Tripti Dimri breakup? Relationship with Anushka Sharma's brother karnesh sharma)

सुरुवातीला या दोघांचं ब्रेकअप या निव्वळ अफवा असल्याचं बोललं जात होतं. पण आता मात्र तृप्ती आणि कर्णेश या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.

तृप्ती डिमरी यांनी कर्णेश शर्माच्या 'बुलबुल' आणि 'कला' या दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

तृप्ती आणि कर्णेश या दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरी यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत.

तृप्तीने कथित बॉयफ्रेंड कर्णेशसोबतचे तिचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून हटवले आहेत, ज्यामुळे दोघांचं ब्रेकअप खरंच झालंय असं सांगण्यात येत आहे.

इतकंच नव्हे, कर्णेश शर्माने त्यांच्या पेजवरून 'कला' आणि 'बुलबुल' मधील तृप्ती डिमरीचे कॅरेक्टर पोस्टर्स देखील काढून टाकले आहेत.

जरी तृप्ती डिमरी आणि कर्णेश शर्मा यांच्या ब्रेकअपमागील कारण उघड झाले नसले तरी, अशी अफवा आहे की दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाले आहेत. आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.

तृप्तीने याआधी कला आणि बुलबुल सिनेमांमध्ये सुंदर अभिनय केलाय. तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय मेरे मेहबूब मेरे सनम या रोमँटिक कॉमेडीसाठी ती विकी कौशलसोबत काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT