Tripti Dimri Parents Reaction On Intimate Scene: Esakal
मनोरंजन

Tripti Dimri: रणबीर कपूरसोबतच्या इंटिमेट सीनवर आई-वडिलांची प्रतिक्रिया काय? तृप्ती म्हणाली...

इंटिमेट सीनवर तृप्तीच्या पालकांनी कशी प्रतिक्रिया दिली होती हे तिने सांगितले आहे.

Vaishali Patil

Tripti Dimri Parents Reaction On Intimate Scene: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे आणि दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचे यश कायम आहे. या चित्रपटामुळे बरेच वाद सुरु आहेत .तर चित्रपटात झोयाची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी ही रातोरात स्टार बनली आहे.

आता तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश म्हटलं जात आहे. तृप्तीच्या लोकप्रियतेत खुप वाढ झाली आहे. या चित्रपटात तिने रणबीरसोबत बरेच इंटिमेट सीन्स दिले आहे. या इंटिमेट सीन्सचीही सध्या चर्चा आहे.

यापुर्वी तृप्तीने ते सीन कसे शुट झाले होते आणि दिग्दर्शक संदिप रेड्डी आणि रणबीरने ती परिस्थिती कशी हाताळली हे सांगितले होते. आता तिच्या या इंटिमेट सीनवर तृप्तीच्या पालकांनी कशी प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे.

बॉलिवूड हंगामासोबतच्या झालेल्या संवादात तृप्तीने याबाबत खुलासा केला. रणबीर कपूरसोबतचे ते इंटिमेट सीन पाहून तिच्या पालकांना धक्का बसल्याचे तिने सांगतिले.

ते म्हणाले, 'आम्ही चित्रपटांमध्ये असं काही यापुर्वी पाहिलं नाही आणि तू ते केलं.' त्या सीनमधून सावरायला त्यांना थोडा वेळ लागला. ते पुढे म्हणाला, 'तू हे करायला नको होतं, पण ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला असं वाटणं सहाजिक आहे.

पुढे ती म्हणाली, 'मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे केले नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी सुरक्षित आहे तोपर्यंत मला ते करण्यात काहीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखेशी 100 टक्के प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी ते केले'

29 वर्षीय तृप्ती डिमरीने 'लैला मजनू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'बुलबुल' आणि 'काला'मध्येही तिने काम केले आहे. मात्र तृप्ती डिमरीसाठी 'अ‍ॅनिमल' चित्रपट टर्निंग पोइंट ठरला. आता ती अनिल रविपुडी यांच्या आगामी 'मास महाराजा' या चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT