Trisha South Actress Comment on Leo Actor Mansoor Ali khan  esakal
मनोरंजन

Trisha Krishnan : 'त्याच्यासारख्या नीच माणसासोबत काम करायची वेळ आली नाही..' अश्लील वक्तव्यावर त्रिशाचे खणखणीत प्रत्युत्तर

साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णननंच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Trisha South Actress Comment on Leo Actor Mansoor Ali khan : साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णननंच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिच्यावर एका अभिनेत्यानं केलेली शेरेबाजी ही चर्चेत आली आहे. सह कलाकार मन्सुर अली खान यांनी केलेली टिप्पणी ही त्रिशाच्या चाहत्यांना आवडलेली नाही. त्यांनी देखील मन्सुर अली खानवर सडकून टीका केली आहे.

अभिनेत्याचे ते विधान आता सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहे. संबंधित कलाकारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे देखील त्रिशानं तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापुढील काळात आम्ही पुन्हा कधीही एकत्रितपणे काम करणार नाही असे त्रिशानं म्हटले आहे. मला त्या अभिनेत्याकडून अशाप्रकारच्या प्रतिक्रियेची अजिबात अपेक्षा नव्हती. या सगळ्यात मन्सूर अलीनं काय म्हटलं होतं की, त्यामुळे त्रिशानं आक्रमकपणे त्या सेलिब्रेटीवर राग व्यक्त केला.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

त्रिशानं तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, माझं लक्ष त्या व्हिडिओकडे गेले आणि मला मोठा धक्का बसला. त्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबाबत वाट्टेल ते बडबडत आहे. ते जे काही बोलले त्याचा मी निषेध करते. त्यांनी केलेलं विधान हे सेक्सिएस्ट, अपमानकारक, महिलांच्या विरोधातील आहे. त्यांनी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यापुढील काळात मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. मी स्वताला नशीबवान समजते की, अशा नीचप्रवृत्तीच्या माणसासोबत मला काम करावे लागले नाही.

मन्सूर अली खान यांनी म्हटले होते की, मला तेव्हा माहिती झाले की, मी त्रिशासोबत काम करणार आहे तेव्हा मला वाटले तो बेडरुम सीन असेल. मी त्रिशाला घेऊन बेडरुममध्ये जाईल आणि मी बाकीच्या अभिनेत्रींसोबत जे सीन केले तसेच मी तिच्यासोबतही करेन. मी पहिल्यांदा देखील असे सीन केले आहेत. ही काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती. या वक्तव्यामुळे मन्सूर अली खान चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT