troller asked shilpa shetty raj kundra separated from marraige or just acting know reply Google
मनोरंजन

Raj Kundra: 'मास्क का घालतोस? पॉर्न सिनेमे बनवायचास?, ट्रोलर्सच्या प्रश्नांना राज कुंद्राचं कडक उत्तर

#AskRaj सेशनमध्ये नेटकऱ्यांनी राज कुंद्रावर नको-नको त्या प्रश्नांचा भडिमार केला.

प्रणाली मोरे

Raj Kundra: जेव्हापासून शिल्पा शेट्टीचा व्यावसायिक पती राज कुंद्राचं नाव पोर्नोग्राफी प्रकरणात गोवलंय तेव्हापासून लोक त्या दोघांच्या नात्यावरही नको त्या कमेंट करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर दोघांच्या घटस्फोटाची बातमीही व्हायरल झाली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मात्र यावर चुप्पी साधली होती. पण आता शिल्पासोबतच्या त्याच्या नात्यावरनं ज्या कमेंट केल्या जात आहेत त्यानं राज कुंद्रा थकला असावा म्हणूनच की काय त्यानं ट्रोलरच्या ट्वीटचं कडक शब्दात उत्तर दिलं आहे.(troller asked shilpa shetty raj kundra separated from marraige or just acting know reply)

एका नेटकऱ्यानं #AskRaj सेशनमध्ये राज कुंद्राला थेट लग्नाविषयीच प्रश्न केला आहे. त्यानं विचारलं आहे,'तू आणि शिल्पा खरंच एकत्र आहात की हा फक्त दिखावा आहे?' या प्रश्नाचं उत्तर राज कुंद्रानं देताना लिहिलं आहे-''हाहाहा. हा प्रश्न मला आवडला. प्रेम म्हणजे अभिनय नाही,आणि याचा दिखावा कुणीच करू शकत नाही. २२ नोव्हेंबरला आमच्या लग्नाचा १३ वा वाढदिवस आहे, शुभेच्छा द्यायला विसरू नका''. राज आणि शिल्पाच्या चाहत्यांना त्याचे हे उत्तर भलतेच आवडले आहे.

troller asked shilpa shetty raj kundra separated from marraige or just acting know reply

राज कुंद्राच्या सेन्स ऑफ ह्यूमरवरही अनेकजण फिदा आहेत. #AskRaj सेशनमध्ये राज कुंद्राला लोकांनी मास्क लावण्याविषयी देखील प्रश्न केला. राजनं सांगितलं की तो मीडियासाठी मास्क घालतो,आपल्या मित्रांसाठी किंवा चाहत्यांसाठी नाही.

troller asked shilpa shetty raj kundra separated from marraige or just acting know reply

एका नेटकऱ्यानं राज कुंद्राला शमिता शेट्टीसंदर्भातही प्रश्न केला. तेव्हा राजनं लिहिलं-''शमिता जे बोलली आहे ते तिनं केलं नाही तर आम्हाला पुढील वर्षी तिचं स्वयंवर ठेवावं लागेल''. यावेळी अनेकांनी पोर्नोग्राफी प्रकरणाचाही प्रश्न छेडला. ट्रोलरनं राजवर हा घणाघाती हल्ला करत लिहिलं आहे-'सर ,तुम्ही अजूनही पोर्न सिनेमांच्या बिझनेसमध्ये आहात का?',त्यावर राजनं लिहिलंय,''कधीच हा बिझनेस केला नाही आणि करणारही नाही''.

troller asked shilpa shetty raj kundra separated from marraige or just acting know reply

राज कुंद्रा आता आपल्या पोर्न सिनेमांसंदर्भातील केसवर स्पष्टपणे बोलताना दिसतो. एक वेळ होती जेव्हा राज कुंद्रानं या केसमुळे सोशल मीडियावरनंही एक्झिट घेतली होती. जेल मधून बाहेर आल्यावर अनेक दिवसांनी हळूहळू राज कुंद्रानं सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवायला सुरुवात केली होती. आणि काही दिवसांनी सोशल मीडियावर तो सक्रिय झाला.

मीडियापासून भले राजने दूर राहायचं ठरवलं असलं तरी त्याच्या सेंस ऑफ ह्युमरनं मात्र तो चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन करताना अनेकदा दिसतो. २१ सप्टेंबर २०२१ रोजी राज कुंद्राचं पोर्नोग्राफी केसमध्ये नाव समोर आलं होतं. त्यानंतर कितीतरी आठवडे त्याला जेलमध्ये राहावं लागलं. तेव्हा शिल्पा शेट्टीनं अनेक देवांना नवस अन् उपासना केली. कठीण प्रसंगी नवऱ्याची साथ मात्र तिनं सोडली नाही.

राजनं नेहमीच आपल्यावरील आरोपांचे खंडन केलेले दिसून आले. त्याला आशा आहे त्याच्यासोबत न्याय होईल आणि सत्य लवकरच समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT