trupti desai,hemangi kavi file image
मनोरंजन

हेमांगीच्या अंतर्वस्त्रावरील पोस्टवर तृप्ती देसाईंचा सवाल

अनेक कलाकारांनी हेमांगीच्या या पोस्टचं कौतुक केलं.

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली होती. या पोस्टमध्ये तिने 'घरात किंवा बाहेर अंतर्वस्त्र घालायचे की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे', असे म्हटले होते. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टचं कौतुक केलं. हेमांगीच्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा या कुठे होत्या?' असा सवाल तृप्ती देसाई यांनी हेमांगीला केला आहे. (trupti desai reacted on hemangi kavi post of wearing bra at home)

तृप्ती देसाई यांची पोस्ट व्हायरल

तृप्ती देसाई यांनी हेमांगीच्या पोस्टवर प्रश्न विचारत एक पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी , 'सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही...' असे लिहीले.

पुढे त्या म्हणाल्या, 'त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी....जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो ,अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही.'

'#नो_ब्रा_डे' साजरा केला पाहिजे'- तृप्ती देसाई

तृप्ती देसाई यांनी पोस्टमध्ये लिहीले, 'इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली "हे ही नसे थोडके".मनापासून शुभेच्छा. माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना अशी आहे की आमच्या भूमाता फाऊंडेशन च्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात" #नो_ब्रा_डे" साजरा केला पाहिजे.कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते.विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा-तृप्ती देसाई संस्थापक-अध्यक्ष भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशन'' तृप्ती देसाई यांनी या पोस्टमध्ये हेमांगी कवीला टॅग केलं असून तिची पोस्ट शेअरही केली आहे.

हेमांगीची पोस्ट

हेमांगीने पोस्टमध्ये लिहीले, 'लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. त्यावरून जज करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा किंवा गॉसिप करण्याचासुद्धा ज्याचा त्याचा चॉईस. अंतर्वस्त्रांचा लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो, त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचा आहे हे लक्षात येतं. गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT