मनोरंजन

तृप्ती देसाई ते उत्कर्ष शिंदे; हे आहेत 'बिग बॉस मराठी ३'चे स्पर्धक

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरु झाला आहे. या सिझनमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यादेखील बिग बॉसच्या घरात असणार असल्याचं स्पष्ट झालंय. नेहमीप्रमाणे दिग्दर्शक महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोचा हा तिसरा सिझन असून यंदा मनोरंजन क्षेत्रातील 15 कलाकार सहभागी होणार आहेत. ते 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील.

कोण कोण आहेत यावेळचे स्पर्धक?

  • तृप्ती देसाई - तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी अनेक आंदोलनं केली आहेत.

  • डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे- गायक उत्कर्ष शिंदे हे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी एक असतील.

  • सोनाली पाटील - कोल्हापूरच्या सोनाली पाटील यांना टिकटॉक या सोशल मीडिया प्लॉटफॉर्मने ओळख मिळवून दिली आहे. देवमाणूस या मालिकेत त्यांनी अँडव्होकेट आर्याची भूमिका साकारली होती.

  • मीरा जगन्नाथ- मीरा यांनी माझ्या नवऱ्याचीची बायको या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.

  • आविष्कार दारव्हेकर- आविष्कारनं आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केलं आहे

  • विशाल निकम- विशाल निकम हे अभिनेते असून साता जन्माच्या गाठी या मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.

  • स्नेहा वाघ- स्नेहा वाघ या हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा आहेत. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT