rucha apte 
मनोरंजन

'तुझ्यात जीव रंगला'मधल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

स्वाती वेमूल

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेत राणादाला मॅटवरची कुस्ती शिकवणारी सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ऋचाने वर्षभरानंतर साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात झळकलेला अभिनेता क्षितिज दाते याच्याशी ऋचाने साखरपुडा केला आहे. तिच्या या फोटोवर सध्या सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

'या गोष्टीला वर्ष झालं', असं म्हणत ऋचाने #engagementin2020 हा हॅशटॅग वापरला. १० फेब्रुवारी २०२० रोजी ऋचा आणि क्षितिजचा साखरपुडा पार पडला. मात्र वर्षभर तिने ही बातमी चाहत्यांपासून लपवली. आता सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने क्षितिजसोबतचं नातं जगजाहीर केलं आहे. तिच्या या फोटोवर स्वानंदी टिकेकर, ऋतुजा बागवे, पियुष रानडे, पर्ण पेठे, पल्लवी पाटील अशा अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

ऋचा आणि क्षितिजने 'बन मस्का' या झी युवा वाहिनीवरील मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. क्षितिज अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत आहे. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात त्याने साकारलेली गण्याची भूमिका विशेष गाजली. यानंतर तो प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या आगामी चित्रपटातही एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. ऋचाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसोबतच 'दिल दोस्ती दुनियादारी', 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तिने चित्रपट आणि मराठी नाटकांमध्येही काम केलंय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT