hardeek joshi
hardeek joshi 
मनोरंजन

साहेबरावमध्ये राणादाचा जीव रंगला! आठवणीत लिहिली भावूक पोस्ट

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. या मालिकेतल्या कलाकारांचीही एकमेकांशी खूप चांगली मैत्री जमली. त्याचप्रमाणे यामध्ये राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीची सेटवरील साहेबराव या बैलाशी एक खास नातं जुळलं होतं. आता मालिका संपल्यानंतर हार्दिक साहेबरावच्या आठवणीत भावूक झाला आहे. तुला आजन्म विसरणार नाही, असं म्हणत हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 

काय आहे हार्दिकची पोस्ट?
'तुझात जीव रंगला या मालिकेने मला जेवढी प्रसिद्धी आणि यश दिलं, त्याचबरोबर साहेबरावसारखा निरागस, प्रेमळ मित्र दिला. मालिका संपली की हळूहळू प्रेक्षक राणाला कदाचित विसरतीलही. परंतु, तुमचा राणा त्याच्या लाडक्या साहेबरावला आजन्म विसरणार नाही. जेव्हा जेव्हा पावलं त्या वाटेकडे वळतील, तेव्हा काही क्षण वाट चुकवून माझ्या साहेबरावला मी नक्की भेटायला जाईन. त्याला मस्त पाटावर नेऊन अंघोळ घालीन, त्याला भरपूर चारा खाऊ घालीन, त्याच्या तोंडावरून मायेनं हात फिरवीन आणि त्याला मिठी मारून गोंजारीन आणि मनातलं सगळं त्याच्याशी भडाभडा बोलीन. मला खात्री आहे, तेव्हादेखील माझा साहेबराव आनंदाने गुबूगुबू मान डोलावत माझं सगळं बोलणं ऐकून घेईन.'

साहेबरावच्या आठवणीत भावूक झालेल्या हार्दिकने पुढे लिहिलं, 'मुक्या प्राण्यांच्या प्रेमाला तोड नाही. साहेबराव मला तुझी खूप जास्त आठवण येतेय. तू या वेड्या राणाला सांभाळून घेतलंस, त्याला नि:स्वार्थ प्रेम दिलंस, त्यासाठी खरंच तुझे आभार. मी लवकरच तुला भेटायला येईन. काळजी घे. साहेबराव पठ्ठ्या तुझ्यात जीव रंगला.'

या मालिकेत हार्दिकसोबत अभिनेत्री अक्षया देवधरने मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीने आणि राणा - साहेबराव यांच्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT