tula pahate re fame actress sonal pawar wedding with boyfriend Sameer Paulaste SAKAL
मनोरंजन

Sonal Pawar Wedding: 'तुला पाहते रे', 'रमा राघव' फेम अभिनेत्री सोनलचा विवाहसोहळा, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री सोनल पवारचं लग्न झालंय

Devendra Jadhav

Sonal Pawar Wedding News: 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री सोनल पवारच्या लग्नाची खुप चर्चा होती. गेल्या अनेक दिवसांपासुन सोनलच्या मेहंदी, हळदीची सोशल मीडियावर खुप चर्चा होती. सोनल अलीकडेच रमा राघव मालिकेत झळकली.

आता सोनलने नुकतंच लग्न केलंय. सोनलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. जाणून घ्या सविस्तर.

सोनलने केलं थाटामाटात लग्न

सोनलने तिच्या बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात लग्न केलंय. सोनलने बॉयफ्रेंड समीर पालुष्टेसोबत थाटामाटात लग्न केलंय. सोनलने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तर समीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, त्यावर जांभळ्या रंगाचं उपरणं, फेटा असा पोशाख परिधान केला होता.

सोनल - समीरने अस्सल पारंपरिक थाटात एकमेकांशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोनलचा नवरा काय करतो?

सोनलने समीर पालुष्टेसोबत लग्न करणार आहे. समीर हा अभिनेता नाही तर एक बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. इतकच नाही तर समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

सोनल - समीरच्या लग्नाबद्दल त्यांच्या फॅन्सनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

RBI Repo Rate: महागाई झाली कमी! आता तुमचा EMI कमी होणार का? RBI लवकरच घेणार मोठा निर्णय

Crime News: कसारा रेल्वेस्थानकात टीसीकडून ७ वर्षांच्या चिमकुलीचा आईसमोरच विनयभंग; महिलेने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अन्...

Panchang 15 July 2025: आजच्या दिवशी ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Solapur News : गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा खा. मोहिते पाटलांकडून निषेध

SCROLL FOR NEXT