tula pahate re fame marathi actress sonal pawar sameer paulaste wedding mehendi video viral wedding date revealed  Esakal
मनोरंजन

Sonal Pawar Wedding: 'तुला पाहते रे' फेम सोनलच्या हातावर रंगली समीरच्या नावाची मेहंदी! कोणासोबत बांधणार लग्नगाठ!

सोनल पवार ही लवकरच तिचा प्रियकर समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Vaishali Patil

Sonal Pawar- Sameer Paulaste Wedding: सध्या मनोरंजन विश्वातही लग्न सराई सुरु झाली आहे. एकामागे एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. त्यात काही मराठी कलाकारही मागे राहिलेले नाही. काही दिवसांपुर्वी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लग्नगाठ बांधली आहे.

तर दुसरीकडे मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर आणि स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्याकडे लग्नापुर्वीचे कार्यक्रम सुरु आहेत.

तर आता आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेंहदी रंगली आहे. अभिनेत्री सोनल पवार ही लवकरच तिचा प्रियकर समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

आता सोनल-समीरच्या घरीही लग्न सराईला सुरुवात झाली आहे. नुकताच सोनलचा मेंहदीचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सोनल केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती.

अनेक पापाराझींनी सोनलच्या मेंहदीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे. नेटकरी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मेहंदी सोहळ्यासाठी खास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याचे दिसत आहे. तर सोनलने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव देखील हातावर लिहिले आहे.

सोनल आणि समीरच्या घरी आता लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज हळदी समारंभ होईल तर हे दोघे 28 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

नोव्हेंबर महिन्यात समीर - सोनल यांनी साखरपुडा केला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सोनलचा होणार नवरा आहे कोण?

सोनलने समीर पालुष्टेसोबत लग्न करणार आहे. समीर हा अभिनेता नाही तर एक बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. इतकच नाही तर समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

तर सोनल ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सुबोध भावे - गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे या मालिकेतून घरघरात पोहचली. सोनल सध्या रमा - राघव मालिकेत झळकत आहे. आता सोनल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याने चाहते तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: तुरुंगवास टळला… पण दोष माफ नाही! माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात हायकोर्टाचा असा निर्णय की राजकारण हादरलं

मोठी बातमी! आगामी भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार नाही एकही शिक्षक; ‘हे’ आहे कारण, डिसेंबरअखेर अंतिम होणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

SCROLL FOR NEXT