Tunisha Sharma esakal
मनोरंजन

Tunisha Sharma : तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी; पोलिसांना खुनाचाही संशय

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. तुनिषानं अवघ्या २०व्या वर्षीच आपलं जीवन संपवल्यानं टीव्ही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

खून आणि आत्महत्या या दोन्ही एँगलने पोलिस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तुनिषाने आत्महत्या केली त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी पोलिस करीत आहेत वालीव पोलिसांनी एएनआयला यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे आता सेटवरच्या प्रत्येकाची याप्रकरणी चौकशी होणार आहे.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

धक्कादायक बाब म्हणजे तुनिषा प्रेग्नंट असल्याचं E24 नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ती प्रेग्नंट असताना बॉयफ्रेन्डनं तिला लग्नाला नकार दिल्याचंही यात म्हटलं आहे. हेच तिच्या मृत्यूमागील कारणंही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अद्याप तिच्या मृत्यूमागील नेमकं कारण समोर आलेलं नसलं तरी पोलिस मात्र खूनाच्या एँगलनेही तपास करीत आहेत.

तुनिषाला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये तिचा जन्म झाला. झाला. अवघ्या 14 व्या वर्षी तिची 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेसाठी निवड झाली होती.

'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. तुनिषाच्या अचानक एक्झिटने हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT