Tunisha Sharma Death Case
Tunisha Sharma Death Case esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Death Case : 'तुनिषा काही कमी नव्हती तिनं तर...' शिझानच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Tunisha Sharma death case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. तुनिषाच्या आईनं एका पत्रकार परिषदेमध्ये शिझानवर टोकाचे आरोप केले आहेत. शिझान हाच तुनिषाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे तुनिषाच्या आईनं म्हटले आहे.

अद्याप तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून वेगवेगळी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पोलिसांना आता त्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. शिझान हा तुनिषाला धर्म परिवर्तनासाठी आग्रह करत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी देखील शिझानला ट्रोल केले आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

तुनिषानं २४ डिसेंबर रोजी अलीबाबा दास्तना ए काबूलच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषा इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र तिच्या या घटनेनं सगळ्यांना कोड्यात पाडले आहे. तुनिषाच्या आत्महत्येपूर्वी देशात श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला घटनेचे पडसाद ताजे असताना तुनिषाच्या घटनेनं पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तुनिषाच्या आत्महत्येला तिच्या आईनं विनिता शर्मा यांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी शिझानला अटक केली असून कोर्टानं त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. यासगळ्यात शिझानच्या वकीलांनी तुनिषावर धक्कादायक आरोप केले आहेत. शैलेंद्र मिश्रा हे शिझानच्या वकीलांचे नाव असून त्यांनी शिझानची कुणी सिक्रेट गर्लफ्रेंड होते की नाही हे उद्या पत्रकार परिषेदतून सांगणार आहे. तुनिषानं काय केलं, ती कुठे चुकली हे तिला माहिती होते. म्हणून तिनं टोकाचे पाउल उचलले.

दुसरं म्हणजे जो कुणी तो पवन मिश्रा आहे तो तुनिषाचा मामा नाही की काका नाही. आम्ही सगळे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणार आहोत. तेव्हा सांगुच की तो खरा कोण आहे, असे वकिलांनी सांगितले आहे. आत्महत्यापूर्वीच शिझानसोबत तुनिषाचे पंधरा दिवसांपूर्वीच ब्रेक अप झाले होते. असे वकीलांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT