TV actor Tunisha Sharma death case Sheezan Khan  Sister and mother arrived crematorium ground
TV actor Tunisha Sharma death case Sheezan Khan Sister and mother arrived crematorium ground  
मनोरंजन

Tunisha Sharma Death Case : तुनिशाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचली शिझानची आई अन् बहिण, पाहा Video

सकाळ डिजिटल टीम

वयाच्या 20 व्या तुनिषानं इतकं टोकाचं पाऊल उचलत टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं रविवारी मालिकेच्या सेट आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस तुनिषाचा प्रियकर शिझान मोहम्मद खान याची चौकशी करत आहेत.

यादरम्यान आज मिरा रोड येथील स्मशानभूमीत तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबियांसोबतच शिझानची आई आणि बहिण देखील उपस्थित होत्या.

तुनिषा शर्माने तिचा सहकलाकार शिझान खानसोबत ब्रेकअप झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे, तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती तर तिच्या पार्थिवावर आज 27 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी शीजान खानची बहीण आणि आईही मीरा रोड परिसरातील स्मशानभूमीत पोहोचली.

तुनिषाच्या आत्महत्येच्या बातमीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आह. दरम्यान या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही एँगलने पोलिस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

तुनिषाने आत्महत्या केली त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी पोलिस करीत आहेत. वालीव पोलिसांनी एएनआयला यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे आता सेटवरच्या प्रत्येकाची याप्रकरणी चौकशी होणार आहे.

'शिझानला शिक्षा व्हायला हवी'

तुनिषाच्या आईचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये तुनिषाच्या आईनं देखील काही खुलासे केले असून त्यामध्ये शेवटपर्यत तुनिषा आपल्याला काही करुन शिझानशी लग्न करायचं आहे, असे सांगत होती. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आलबेल नव्हते. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचेही तुनिषाच्या आईनं सांगितलं आहे.

एका मुलाखतीमध्ये शिझानविषयी सांगताना तुनिषाच्या आईनं आपला संताप व्यक्त केला आहे. आता माझी मुलगी गेली आहे.मात्र ज्याच्यामुळे तिनं हे टोकाचे पाऊल उचलले त्या शिझानला शिक्षा व्हायला हवी.अशी मागणी पोलिसांकडे तुनिषाच्या आईनं केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT