tv actress avika gor and adil khan wedding photos viral know the truth 
मनोरंजन

बालिका वधूच्या आनंदीनं केलं गुपचूप लग्न?, फोटो व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारतीय टेलिव्हिजनवर ज्या काही प्रसिध्द मालिका आहेत त्यापैकी एक म्हणजे बालिका वधू. या मालिकेला मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. डेली सोपमध्ये आतापर्यतची सर्वाधिक पसंतीची मालिका म्हणूनही प्रेक्षक बालिका वधूचे नाव घेतात. एक टिपिकल फॅमिली सीरियल म्हणून या मालिकेचा उल्लेख करावा लागेल. आता या मालिकेतील प्रमुख कलाकारानं आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील कुतूहल जागृत झाले आहे. ती बातमी आहे तरी काय, बालिका वधूमध्ये आनंदीची भूमिका करणा-या अविका गोरनं लग्नाचे फोटो व्हायरल केले आहेत. तिच्या त्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

ज्यावेळी अविकानं हे फोटो शेअर केले तेव्हा तिला चाहत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बालिका वधूमधील प्रमुख भूमिका साकारणा-या आनंदीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की अविकानं लग्न कधी केलं. आणि ते ही कुठलीही माहिती न देता. इतरवेळी सोशल मीडियावर सारखी अॅक्टिव्ह असणा-या अविकानं एवढ्या गुपचूपपणे का लग्न केले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यावर आनंदीनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अविकाच्या चाहत्यांना तिनं गुपचूप लग्न का केलं याविषयी जाणून घ्यायचे आहे.

सध्या अविकाचा वधूच्या वेषातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिनं दुस-या एका धर्मातील वधूची वेशभूषा केली आहे. त्यावरुन तिला फॅन्सनं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. अविकाच्या समोर असणा-या आदिलचा लूकही लक्ष वेधून घेणारा आहे. त्याच्या फोटोला युझर्सनं पसंती दर्शवली आहे. त्या फोटोमध्ये अविका आणि आदिल यांनी एकमेकांच्या हातात हात दिला आहे.  अविकानं त्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, फायनली...त्याखाली लिहिले आहे की, कादली - स्टे ट्युन. त्यामुळे असे वाटत आहे की तो एक गाण्याच्या शुटिंगचा सीन आहे.

अनेकांनी अविकाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अविका आणि आदिलचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वास्तविक अविका रोडिज लाईफमधील मिलिंद चंदवानीला डेट करत आहे. तिनं यापूर्वी त्याच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यालाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आज तिच्या मित्राचा जन्मदिवस असल्यानं तिनं काही पोस्ट शेअर केल्या आहेत. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT