Mohit Raina Wedding Esakal
मनोरंजन

Mohit Raina Wedding: नाहीतर मी तिसरा डोळा उघडेल! महादेव फेम मोहित रैनाच्या घटस्फोटावर संताप

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता मोहित रैना सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पत्नी अदितीपासून वेगळा झाला आहे. खरं तर, 2022 च्या सुरुवातीला मोहितने अदिती शर्मासोबत लग्न केल्याचं सांगितलं होतं, त्याने आपल्या इंस्टाग्रामवरून लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले होते.

त्यामूळं दोघांमध्ये काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगली. इतकच नाही तर तो पत्नी अदिती शर्माला घटस्फोट देणार असल्याची अफवा लोकांनी पसरवली. आता अखेर मोहितनेच या सर्व प्रकरणावर उघडपणे बोलंला आहे.

मोहित रैनासोबत एका वृत्त वाहिनीने संवाद साधला असता त्याने या सर्व बातमीवर स्पष्टिकरण दिलं आहे. या सर्व बातमीला अफवां म्हणत त्यांन उत्तर दिलं आहे, "हा काय मूर्खपणा आहे. ही अफवा निराधार आहे. मी आता हिमाचल प्रदेशात आहे आणि माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे."

इतकंच नाही तर त्याने डोंगरातील निसर्गरम्य वातावरणात एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यावरून हे स्पष्ट झाले आहे की यादोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. मात्र, यावेळी त्यांने फोटो डिलिट कारण्याचं दिले कारण सांगितलेलं नाही.

मोहित रैना आणि आदिती शर्मा यांचा विवाह १ जानेवारी २०२२ रोजी झाला होता. त्यानंतर त्याने आपल्या सुंदर सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र एक फोटो आणि व्हिडिओ वगळता त्याने पत्नीसोबतच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या, त्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. यावर अभिनेत्यानेही मौन पाळले पण आता त्याने सर्वांना चोख प्रत्युत्तर देत सत्य सांगितले आहे.

मोहितला खरी ओळख टीव्ही सीरियल देवों के देव महादेव मधून मिळाली. या शोमध्ये तो महादेवाच्या भूमिकेत दिसला होता. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त, तो 'शिद्दत', 'मुंबई डायरीज 26/11', 'भौकाल', 'काफिर' इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT