Bigg Boss 16 Salman Khan Shalin Bhanot Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: सबसे बडा रुपैया! शालिनं दिला टिनाला पैशांसाठी दगा?

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस शो आता दिवसेंदिवस अधिक रंजक होतं आहे. त्यातच आठवड्याच्या शेवटी घरातून कोणत्या सदस्याला घराबाहेर जावं लागत हे पाहणं उत्सूकतेचे ठरते. यावेळी टिनासोबत निमृत कौर अहलुवालिया, सुंबूल तौकीर खान आणि एमसी स्टॅन यांनाही नॉमिनेट करण्यात आलं होतं.यावेळी 4 स्पर्धकांवर नामांकनाची टांगती तलवार आहे. त्यापैकी सलमान खान निमृत आणि एमसी स्टेनला सैफ म्हणून सांगतो. आता बाकी टीना दत्ता आणि सुंबुलची आहे .

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

आज शनिवारच्या वारमध्ये असून आज सलमान खान शालीनसमोर मोठं आव्हान देणार आहे. शोच्या निर्मात्यांनी बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये, सलमान खान शालीनला तिला टीना आणि सुंबूलला सुरक्षित ठेवण्याची मोठी संधी देत आहे. सलमान शालीनला सांगंतो की बजर दाबून तो टीना आणि सुंबूलला वाचवू शकतो. पण सलमान पुढे म्हणतो की जर त्याने बजर दाबला तर बक्षीस रक्कमेतील 25 लाख रुपये देखील तो गमावेलं.

सलमानचं बोलंण ऐकल्यानंतर शालीन गोंधळात पडलेला दिसतो. कारण एकीकडे टीना आहे जिच्यावर तो प्रेमा करत असल्याचा दावा करतो तर दुसरीकडे आधीच त्याचं 25 लाखांचं नुकसान झालं आहे. आता उरलेले 25 लाखही गमवले तर त्याच्या गेमला काही अर्थ राहणार नाही.. मात्र, सलमान शालीनला याचा विचार करण्यासाठी खूपच कमी वेळ देत आहे. त्यामूळे त्याला तडका फडकी निर्णय घ्यावा लागणार असल्याचं दिसतयं मात्र तो प्रेमापेक्षा पैशांना महत्व देणार असल्याचं दिसतंय. मात्र याअधीच टीना दत्ताला या आठवड्यात घरातुन बाहेर जावं लागणार असा दावा करण्यात आला आहे. तुम्ही कलर्स चॅनल आणि वूट अॅपवर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT