Big Boss 16 Salman khan Abdu Rozik esakal
मनोरंजन

Big Boss 16: अन् सलमान संतापला! अब्दू रोजिक बिग बॉस बाहेर?

सकाळ डिजिटल टीम

आजारपणातुन परतलेला सलमान पुन्हा त्याच्या जून्या अंदाजात परतला आहे. येताच त्याने त्याच्या मागे शोमध्ये झालेले राडे आवरायला सुरवात केली आहे. 'फ्रायडे का वार'मध्ये तो सर्वांचा क्लास घेतांना दिसतोय. येताच त्याने अंकित आणि सुंबुल यांना धारेवर धरलं.

मात्र नुकतचं बिग बॉसच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमुळे चाहत्यांना नक्कीच दु:ख होणार आहे. या ह आठवड्यात घरातील सात सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार लटकलेली आहे. यात निमृत कौर अहलुवालिया, गौतम विग, गोरी नागोरी, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा, अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांचा सामावेश आहे. यात  अब्दु रोजिकवर घराबाहेर जाण्याची वेळ आल्याचे प्रोमोत दिसतेय. शोच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान चांगलाच संतापलेला दिसत आहे.

तो घरातील सदस्यांवर खूप नाराज आहे आणि बोलतो की तुम्ही सर्व अब्दूला नॉमिनेट करत असतात. तो  मजबूत आहे मजबूत आहे असं म्हणतात, याचा परिणाम पहायचा आहे तुम्हाला आता अब्दु हा शो सोडुन जात आहे. यानंतर सलमान अब्दूला घरातून बाहेर येण्यास सांगतो त्यानंतर अब्दू जड अंतःकरणाने त्याच्या जागेवरून उठतो .हे ऐकून घरातील प्रत्येक सदस्यांना धक्का बसतो त्याच वेळी निमृत रडायला लागते आणि 'नो सर, प्लीज नाही' म्हणते आणि अब्दूला थांबवण्याचा प्रयत्न करते.

अब्दु रोजिक हा एक तगडा स्पर्धक आहे. केवळ घरातच नव्हे तर तो बाहेरही सर्वांचा चाहता आहे. तो सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. तो फिल्टरशिवाय खेळण्याचे बोलले जाते.स्वत: सलमानने देखील त्याची अनेकवेळा स्तृती केली आहे. त्याच्या नॉमिनेशननंतरही नेटकऱ्यांनी प्रियंकाला चांगलंच झाडलं होतं. आता अब्दू खरंच घराबाहेर जातो की हा फक्त एक प्लॅन आहे. शोचा टिआरपी वाढवण्यासाठी हे भासवलं जात आहे. हे पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतरच कळेलच मात्र अब्दुच्या जाण्याचा परिणाम हा शोच्या रेटिंगवर होइल हे नक्कीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT