yammni malhotra  
मनोरंजन

चालत्या कारला लागली आग, अभिनेत्री थोडक्यात बचावली

टीव्ही मनोरंजन tv entertainment क्षेत्रातील एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन tv entertainment क्षेत्रातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री यामी मल्होत्रा yamini malhotra ही एका कार अपघातातून थोडक्यात बचावली आहे. त्याचं झालं असं की, ती ज्या गाडीतून आपल्या चित्रिकरणाच्या स्थळी चालली होती त्या गाडीनं अचानक पेट घेतला. ती घाईनं त्या गाडीतून बाहेर पडली. त्यानंतर गाडीला मोठी आग लागली. अशी माहीती यामीनं दिली आहे. यामी मल्होत्रा टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एक मोठी सेलिब्रेटी आहे. तिनं आपल्या अपघाताबाबत सोशल मीडियावरही माहिती दिली आहे. तिची पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे.

त्या पोस्ट नंतर यामीनं आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगत चाहत्यांना दिलासा दिला आहे. या अपघाताविषयी यामीनं टाइम्स ऑफ इंडियाशी बातचीत केली. तिनं सांगितलं की, मी कार ड्राइव्ह करत जुहू वरुन लोखंडवालाला गेली. अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. तेव्हा काय करावं मला कळेनाच. तोपर्यत आग वाढत होती. त्यानंतर मी माझ्या सोशल मीडियावरुन ही माहिती लोकांना दिली आहे. जेणेकरुन त्यांनीही आपल्या चारचाकीमधून प्रवास करताना काय काळजी घ्यावी याविषयी दक्ष राहावं. यामीनं सांगितलं, हे सगळं इतक्या अचानकपणे घडत होतं की मला काय करावं कळेना.

त्यावेळी रस्त्यावरील लोकांनी माझी मदत केली. त्य़ांनी फायरब्रिगेड आणि पोलिसांना फोनही केले. फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यत माझी कार जळून गेली होती. मला खूप टेन्शनही आलं. मी रडत गाडीकडे पाहत होते. त्या आगीनं कारला राख करुन टाकलं. कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मी तेव्हा काहीही करु शकत नव्हते याचे वाईट वाटले. माझ्य़ा डोक्यात तेव्हा एकच विचार होता जर मी त्या कारमध्ये अडकले असते तर काय केलं असतं? मला कुणी वाचवायला आले असते का? मी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. त्यानंतर कारचं सर्वेक्षण करण्यासाठी मला त्यांच्याबरोबर घटनास्थळी यावं लागलं.

मी देवाची आभारी आहे, ज्यानं मला या संकटातून वाचवलं. मी त्या कारचे फोटो काढले. आणि काही तासांचा माझा आनंद एका मोठ्या संकटात परिवर्तित झाला होता. मला याचे नवल वाटत होते. हा प्रसंग आपल्या आयुष्यातील अनिश्चितता सांगतो. हा सगळा प्रसंग यामीनं आपल्या सोशल मीडियावरुन शेयर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT