MC Stan Esakal
मनोरंजन

MC Stan: 'हो म्हणा नाहितर...' एमसी स्टॅननं गर्लफ्रेंडच्या बापालाचं धमकावलं

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सगळेचं स्पर्धक विचित्र आहेत. कधी कोण काय पराक्रम करेल सांगता येत नाही. त्यातच एमसी स्टॅन तर वेगळ्याचं लेव्हवलचा खेळ खेळतो.तो यावेळी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. स्टॅन फारच कमी बोलत असला तरी तो बोलतो तेव्हा सगळ्यांचीच बोलतीच बंद करतो. तो घरातच नाही तर सोशल मिडियावर प्रंचड प्रसिद्ध आहे. तो त्याच्या बोलीभाषेमूळेही चर्चेत असतो. त्याचे अनेक डॉयलॉग हे सोशल मिडियावर व्हायरल आहेत.

तो त्याच्या परर्सनल लाईफमूळेही चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये येतांनाचं त्याने सलमानला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं, त्यानंतर अनेकदा तो त्याची गर्लफ्रेंड बूबाबद्दल चर्चा करताना दिसतो. यावेळी त्याने आपली प्रेमकहाणी तर सांगितलीच, शिवाय बुबाच्या घरच्यांनासोबत काय केलं हेही सांगितले.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

'बिग बॉस 16' चा कालचा एपिसोड खास होता. अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर यांच्याशी बोलतांना एमसी स्टॅनने त्याच्या लव्ह लाइफबद्दल मोठे खुलासे केले. प्रियांकाने त्याला विचारलं की तिची मैत्रीण बुबाच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती आहे का? त्यावेळी त्याने खुलासा केला की तो 40 लोकांसह तिच्या पालकांच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी गेला होता. तो म्हणाला की तो तिच्या वडिलांच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेला होता पण तिच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यावेळी त्याने बुबाच्या आई-वडिलांना सांगितलं की एकतर हे नातं सन्मानाने मान्य करा नाहीतर मी तिला पळवून घेवून जाईलं'

भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. त्याच घरातल्या ठराविकचं लोकांसोबत जास्त जमतं. आपल्या हटक्या बोलिभाषेमूळे किंवा त्याच्या अतरंगी राहणीमानामूळे तो चर्चेत राहणारा एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT