Bigg Boss 16 Shiv Thakare  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: अख्या घराला बोटावर नाचवणारा शिव आज ढसाढसा रडला! अर्चनाचेही अश्रू अनावर.. कारण ऐकून..

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस16 या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हा खेळ आता रंगात येत आहे. यात वादविवादच नव्हे तर कधी वातावरण हाणामारी पर्यंत जातं. मात्र शोच्या आगामी 4 डिसेंबरचा एपिसोडमध्ये वेगळ चित्र पहायला मिळणार आहे. हा एपिसोड खूपच भावूक असणार आहे.

'फॅमिली वीक' टास्क अंतर्गत स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येतील असं वाटतं आहे. पण आता थोडं वेगळ घडतयं, बिग बॉस कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या मनातील भानना शेअर करण्याची संधी देणार आहेत. जेव्हा बिग बॉसने ही संधी दिली तेव्हा घरातील सर्व सदस्य भावूक झालेले दिसले तर शिव ठाकरे आणि प्रियंका जोरजोरात रडतांना दिसताय.

निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यात प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतोय ' खूप दिवस झाले घरातल्यांपासून दुर आहात. चला माझ्यासोबत मनापासून बोलूया.'

जेव्हा शिव कन्फेशन रूममध्ये जातो तेव्हा तो बिग बॉसला सांगतो, ' काहींना वाटतं की मी डोक्याने खेळतो . पण घरच्यांना माहीत आहे की मी नेहमी माझ्या मनाचं ऐकतो. मला त्यांच्यासमोर रडताही येत नाही. नाहीतर मी कमजोर वाटेल.'

त्यानंतर अर्चनाचही वेगळचं रुप दिसतं अर्चना गौतमलाही आपले अश्रू आवरता येत नाही. तिचा नंबर आल्यावर तिला रडू कोसळले आणि म्हणते की आजपर्यंत मी कोणालाच काही वाईट बोललो नाही आणि या घरात आल्यानंतर मी अशी का झाली हे मला माहीत नाही. तर प्रियांकाही खूप रडतांना दिसतेय.एकंदरीत आगामी एपिसोड खूपच भावनिक असणार आहे, असं दिसतयं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT