मनोरंजन

'तुला गडकरींचा फोन नाही आला का?', कपिलचा अजय देवगणला उपरोधिक प्रश्न

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये कपिल शर्माचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये कपिल शर्माचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्याच्या द कपिल शर्मा शो ला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंतीही मिळताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात या शोचं प्रक्षेपण प्रेक्षकांना काही पाहता आले नाहीत. त्यामुळे रिपिट टेलिकास्टच्या माध्यमातून कपिल चाहत्यांना भेटत होता. आता पुन्हा या मालिकेचं चित्रिकरण सुरु झालं आहे. त्यात कपिलचे नेहमीचे साथीदारही सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेता अजय देवगण कपिलच्या शो मध्ये आला होता. त्याचे येण्याचे कारण म्हणजे भुज चित्रपटाचे प्रमोशन. त्याच्या प्रमोशनसाठी आल्यानंतर कपिलनं त्याला आपल्या नेहमीच्या पद्धतीनं काही प्रश्न विचारले. मात्र यावेळी अजयनचं कपिलची फिरकी घेतली. अजयनं दिलेल्या उत्तरानं कपिलला काय बोलावं असा प्रश्न पडल्याचे दिसून आले आहे.

२१ ऑगस्टपासून कपिलचा द कपिल शर्मा शो पुन्हा सुरु होणार आहे. यावेळी त्याच्या शो मध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आला होता. त्याच्या बेल बॉटम चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. याशिवाय अजय देवगणही त्याच्या भुज चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी या दोघांनीही कपिल सोबत अनेक गंमती जमती केल्या. समोरच्याला एखादा वेगळा प्रश्न विचारुन निरुत्तर करणं हा खरं तर कपिलचा स्वभाव आहे. मात्र यावेळी काही वेगळंच घडलं. कपिलला अजयनं असं काही उत्तर दिलं. की कपिलला काय बोलावं हे कळेना. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. त्यात अजयनं कपिलला सांगितले की, तुझा हा शो जानेवारीमध्ये बंद पडला. आणि फेब्रुवारीमध्ये तुला मुलगा झाला. एका अर्थानं तुझं एक प्रॉडक्ट रिलिज झालं. यावर उपस्थित सर्वांना हसु काही आवरत नाही. अजयही हसु लागतो. अशाप्रकारे वेगवेगळ्या गंमती जमती करत या दोघांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.

शेवटी कपिलनं देखील अजयला एक गुगली टाकली. तो म्हणाला, तुमचा नुकताच भुज नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात तुम्ही तीनशे लोकांसमवेत तुटलेला रन वे बनवताना दिसता. तुम्हाला हे सगळं कसं शक्य झालं. या कामासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा फोन आला नाही का, कारण त्या चित्रपटामध्ये तुम्ही तीन दिवसांत तो रन वे बनवताना दिसता. अशावेळी देशातील वेगवेगळ्या हायवे आणि रस्त्यांच्या कंत्राटाप्रकरणी तुम्हाला गडकरी यांचा फोन यायला हवा होता. अशी मिश्किल टिप्पणी कपिलनं यावेळी केली. तेव्हाही मोठा हशा पिकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT